Parbhani Crime News esakal
मराठवाडा

Parbhani Update : परभणीत बँकेतून चोरट्यांनी ग्राहकाचे १ लाख रुपये पळविले

घटनेमुळे बँक परिसरात एकच खळबळ उडाली.

गणेश पांडे

परभणी : प्लॉट खरेदीसाठी बँकेतून रोख रक्कम काढून निघणाऱ्या एका बँक ग्राहकाच्या हातातून चोरट्यांनी एक लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.१७) स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या समोरील भारतीय स्टेट बँकेच्या आवारात घडली. दरम्यान, ही रक्कम पळविणारे चोरटे बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. परभणी (Parbhani) महापालिकेतील कर्मचारी अल्तमश अली मीर अशफाक अली हे गुरुवारी दुपारी स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील भारतीय स्टेट बँकेत (State Bank Of India) आले होते. त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपयांची रक्कम काढली. बँकेतून काढलेली रक्कम स्वतः जवळील बॅगमध्ये ठेवली. बँकेच्या आवारात असलेल्या एका लाकडी बाकावर ते बसलेले असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या अंगावर पावडर टाकले. (Thieves Stolen one Lakh In Parbhani)

झाडावरुन काही तरी पडले असे सांगत अल्तमश अली यांच्याकडील बॅग हिसकावून पोबारा केला. अल्तमश अली हे चोरट्यांच्या मागे धावले. मात्र सदर चोरटा आपल्या दुसर्‍या एका साथीदारासोबत मोटारसायकलवर बसून पळून गेला. या घटनेमुळे बँक परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मोंढा पोलिसात देण्यात आली. स्थागुशा, मोंढा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळास भेट

परभणीचे सहायक पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी तातडीने बँकेस भेट देत तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन तरूण दिसत आहेत. हे संशयित तरूणांचे छायाचित्र पोलिसांनी व्हायरल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT