file photo 
मराठवाडा

उमरग्यातील 'एमआयडीसी'मध्ये चोरट्यांची दशहत! शिक्षकाला लुटले

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील जकेकूर परिसरातील एमआयडीसीत (MIDC) बरेच उद्योग सुरू झाल्याने वर्दळ वाढली आहे. परिसरातील अनेक भागांना जोडणारे डांबरी रस्ते सर्वांना आकर्षण ठरणारे असल्याने उमरगा (Umarga) शहरासह परिसरातील नागरिक या ठिकाणी मार्निंग - इव्हिनिंग वाॅकिंगसाठी येतात. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्यांच्या दशहतीने नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान रविवारी (ता. २२) सायंकाळी सातच्या सुमारास फिरायल्या गेलेल्या एका शिक्षकाला दोन चोरट्यांनी मारहाण करून एक लाखाचा ऐवज (Osmanabad) लुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सोमवारी (ता.२३) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील मुरूम येथे खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले औरादचे रहिवाशी व हल्ली जकेकुरवाडी येथे वास्तव्यास असलेले प्रल्हाद दत्तुपंत काळे यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतरच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांचे भाऊ मालाजी, राजेंद्र व मित्र बालाजी आषटे यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम घेतली होते.

त्यापैकी नव्वद हजार रुपये धार्मिक कार्यक्रमात खर्च करुन उर्वरित रक्कम पन्नास हजार रुपये स्वतःजवळ होती. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जकेकुर परिसरात वॉकिंग करुन दुचाकीवरून परत निघण्याच्या तयारीत असताना विनानंबरच्या दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेतील दोघे जवळ आले, तुम्ही कुठून आलात, तुमच्याकडे खूप पैसे आहेत असे म्हणून खिसे तपासू लागले. या वेळी शिक्षक श्री. काळे व त्या दोन चोरट्यात चांगलीच झटापट झाली. यात श्री. काळे बाजूच्या खड्यात पडले, खड्यातही झटापट सुरूच होती. त्यावेळी चोरटे उजव्या हातातील दोन बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढताना. श्री. काळेंनी एकाचा चावा घेतला असता हत्याराचा धाक दाखवून हाताच्या बोटातील दिड तोळे वजनाच्या ४५ हजार किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, वॉच पाकिटमधील रोख पन्नास हजार व दोन हजार किमतीचा साधा मोबाईल असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन चोरटे दुचाकीवरून लातूरच्या दिशेने फरार झाले. तेंव्हा भयभित झालेले श्री. काळे पोलिस ठाण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश आष्टे, माजी सदस्य दिलीप भालेराव, याकुब लदाफ यांनी याबाबत पोलिसांशी चर्चा केली. या प्रकरणी प्रल्हाद काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव हे करीत आहेत.

टायर विक्रेत्याने शिफातीने केली सूटका !

आठ दिवसापूर्वी जकेकुर- चौरस्ता येथून उमरग्याकडे वाहनातून निघालेले टायर विक्रेत्याला अडवून दोघांनी टायरच्या मागणीची बतावणी करुन गाडी अडविली. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर मारहाण केली तेंव्हा मोठ्या शिताफीने गाडी उमरग्याच्या दिशेने पळवल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. हा प्रकार राष्ट्रीय महामार्गावर सांयकाळी सातच्या सुमारास घडला होता. परंतू या प्रकरणी तक्रार देण्यात आली नव्हती. असे असले तरी पोलिस यंत्रणा काय करते आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान चौरस्ता व परिसरात येथे उमरग्यातील अनेकांचे व्यवसाय आहेत. त्यांना रात्री घराकडे परतताना कठीण झाले आहे.

एमआयडीसीत स्वतंत्र पोलिस चौकीची गरज !

एमआयडीसीत अनेक व्यवसाय, उद्योग उभारी घेत आहेत. अनेक जण वास्तव्यासही आहेत. त्यामुळे नागरिकासह उद्योगाच्या सूरक्षिततेसाठी एमआयडीसीत स्वतंत्र पोलिस चौकीची गरज आहे. चौरस्ता बीटचे पोलिसांची गस्त या भागात असते मात्र त्याचे फारसे लक्ष नसते. त्यामुळे चोरट्यांना संधी मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT