फोटो 
मराठवाडा

थर्टी फर्स्ट करतांना सावधान, पोलिसांची आहे नजर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाला आहे. ओल्या पार्ट्या व डीजेवर नाचत दारुची झिंग चढवून बेदरकारपणे वाहन चालवून स्वत: ला किंवा दुसऱ्याला धोका पोहचेल, तसेच कायदा व सुव्यवस्था बाधीत करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. वेडीवाकडी वाहन चालवितांना सापडले गेल्यास आपला मुक्काम रात्रभर पोलिस ठाण्यातच राहणार असून नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना आपला होश गमावून बसु नका असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी केले आहे. 

नांदेड जिल्हा हा संवेदनशिल जिल्हा म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे कुठलाही बंदोबस्त पोलिस विभाग सहज घेत नाही. रस्त्यावर उतरतांना ते सर्व तयारीनीशी उतरतात. कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये यासाठी कोणतीही जोखीम न पत्करता शहर व जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दारु पिऊन वाहन चालवितांना वाहुतुक शाखेला जर आपण आढळला तर आपल्यावर नुसती दंडात्मक कारवाई करून सोडल्या जाणार नाही तर त्या दिवशीचा मुक्काम पोलिस ठाण्यात राहणार आहे. ‘थर्टी फर्स्ट सेलेब्रेशन’ ची तयारी करण्यापूर्वी पोलिसांचा आक्रमक पावित्रा लक्षात घेणे आवश्‍यक आहे. 

स्टंटबाजावर होणार कारवाई :

नविन वर्षाचे स्वागत जल्लोषात करा, मात्र कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घ्या. तसेच दुचाकीवरून शहरात स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांनी असा प्रकार करु नये. दंड आकारून आपणास सोडले जाणार नसून रात्र ठाण्यात काढावी लागणार आहे. 

धाबे, हॉटेल व बारवर आहे लक्ष :

शहर व परिसरातील जवळपास १०० धाबे, हॉटेल व बारवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. ज्या हॉटेलवर डीजे लावून झिंग चढलेले तरूण सापडतील तर संबंधीत हॉटेलचालकासह त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याची दखल सर्व धाबे व बार, व हॉटेल चालकांनी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

पुढच्या वर्षापासून बंद :

नविन वर्षाला निरोप देतांना अनेक तळीराम पुढच्या वर्षापासून बंद म्हणून एका मागोमाग एक पेग घेतात. त्यानंतर झींग चढताच आपल्या वाहनावर सुसाट वेगाने निघतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी शुद्धीमध्ये आपल्या परिवारात जावे असे आवाहन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT