file photo 
मराठवाडा

‘त्या’ तिघांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचा शोध सुरू

गणेश पांडे

परभणी : दिल्लीहून आलेल्या ‘त्या’ तिघांच्या संपर्कात आलेल्या अन्य पाच जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. हे पाच जण परभणीसह जिंतूर, सेलू, मानवत व गंगाखेड या तालुक्यातील असल्याने संबंधित पोलिस ठाण्याला त्या पाच व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळात मोठ्या प्रमाणात लोक वास्तव्याला असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तेथे धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांपैकी अनेक जण कोरोनाग्रस्त असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या किंवा त्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या लोकांवर शासनाची करडी नजर आहे. या धार्मिक कार्यक्रमात परभणीचे तिघेजण सहभागी झाले होते. या तिघांना जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.३१) रात्री ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात असोलेशन करण्यात आले आहे. हे तिघे १३ मार्च रोजी परभणी शहरात दाखल झाले होते. 


 जिल्हा प्रशासनाला मिळाली माहिती
या तिघांच्या संपर्कात अन्य पाच जण आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. हे पाच जण परभणीसह जिंतूर, सेलू, मानवत व गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी आहेत. या तिघांनाही तातडीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या घरी विलगीकरण करून ठेवावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत. जिल्हा पोलिस दलाने या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्याला सदर व्यक्तींची नावे त्यांचं गाव व तालुका कळवला असून त्या पाच जणांना तातडीने ताब्यात घेतले जाणार आहे.

परभणीत १८८ संशयित
परभणीत कोरोना विषाणू संशयित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. बुधवारी (ता. एक) सांयकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहिती पत्रकात संशयित रुग्णांचा आकडा १८८ वर गेला आहे. ११७ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. ३१ जण संसर्गजन्य कक्षामध्ये उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT