file photo 
मराठवाडा

`त्या’ शिक्क्यांनी महिलेला दिला धक्का...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेजाऱ्याच्या मदतीने ओळख पाडून विश्‍वासात घेऊन एका महिलेला सोन्याचे बनावट शिक्के देऊन ६० हजाराची फसवणुक करणाऱ्या चार जणांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता. १७) रोजी सायंकाळी एसबीआय बँंक शाखा, माहूर समोर घडली. 

पाचोंदा (वानोळा) ता. माहूर येथील महिला संगिता शेषराव तोडकर (वय ४५) यांच्यासोबत बनावट सोन्याचे शिक्के देणाऱ्यापैकी एकाची ओळख होती. त्याच्या माध्यमातून टोळीने एकमेकांत विश्‍वास निर्माण केल्याने त्यांनी श्रीमती तोडकर यांना आमच्याकडे सोन्याचे शिक्के आहेत. व ते आम्हाला विकायचे आहेत. आपली ओळख झाल्याने आम्ही ते शिक्के तुम्हाला कमी पैशात देतो असे आमिष दाखविले. त्यासाठी श्रीमती तोडकर यांच्याकडून त्यांनी ६० हजार रुपये घेऊन बनावट ११ शिक्के दिले. 

बनावट शिक्के असल्याचे पुढे आले

दोन दिवसांनी त्यातील एक शिक्का घेऊन ती महिला आपल्या ओळखीच्या सराफाकडे गेली. यावेळी ते शिक्के बनावट असल्याचे सराफाने सांगितले. आपली फसगत झाली की काय म्हणून त्यांनी परत जावून शिक्के देणाऱ्यांना जावुन पाहिले तर हे चारही भामटे तेथून पसार झालेले दिसले. त्यांनी बुधवारी (ता. १९) माहूर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकरणाची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन लक्ष्मण तुळशीराम देवकर, गजानन लक्ष्मण देवकर आणि इतर दोन अशा चार जणांवर संगनमताने फसवणुक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शरद घोडके करत आहेत.  

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कमी किंमतीत सोने किंवा दामदुप्पट देणारी टोळी मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात फसवणुक करीत आहेत. अशा आमिष दाखविण्याऱ्या लोकांपासून नागरिकांनी सावध रहावे. तसेच अशा लोकांबद्दल काही संशय आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे असे आवाहन फौजदार शरद घोडके करत आहेत. या प्रकरणातील चारही आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करत असल्याचे फौजदार शरद घोडके यांनी सांगितले.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT