file photo 
मराठवाडा

नांदेडच्या उत्पादन शुल्कने केली ५० हजाराची दारु जप्त 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात देशी दारु, हातभट्टी, सिंदी तसेच परराज्यातील बनावट दारु नांदेडकरांच्या गळी उतरु नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या पथकाद्वारे अशा अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करत आहे. त्यांच्या एका पथकाने बरबडा (ता. नायगाव) शिवारात असलेल्या एका धाब्यावर मंगळवारी (ता. ११) छापा टाकून विनापरवाना ५० हजार रुपयाचा देशी व विदेशी दारुचा साठा जप्त केला. यावेळी पथकानी एकाला अटक केली. 

नांदेड शहर हे तेलंगना व कर्नाटक या राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात अवैध दारु विक्री करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात शिरकाव करते. तसेच जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यात जंगल भाग जास्त असल्याने त्या परिसरात मोहफुले मुबलक प्रमाणात मिळतात. त्याफुलांचा वापर करून रसायन मिश्रीत हातभट्टी दारू तयार करतात. अशा अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभाग नेहमी कारवाया करत असून त्यांचे अड्डे उद्धवस्त करण्यात येतात. तरीसुद्धा या दारुचा महापूर या भागात वाहतो. अनेकांचे या दारु सेवनामुळे आरोग्य बिघडले. 

साईराज धाब्यावर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी जिल्हाभरात आपल्या पथकांद्वारे अशा अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या विभागाचे एक पथक नायगाव तालुक्यात कारवाईसाठी गेले असता त्यांनी बरबडा शिवारात असलेल्या साईराज धाब्यावर छापा टाकला. यावेळी गोवा राज्य निर्मित मॅकडॉल नं. १ व इम्पेरीयल ब्ल्यु विदेशी मद्य विक्री करतांना आढळून आले. ४९ हजार ३९९ रुपयाचा देशी व विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गंगाधर माणिक मद्देवाड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

कारवाईसाठी यांचे प्रयत्न 

या कारवाईमध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, दुय्यम निरिक्षक पी. जी. कदम, पी. बी. टकले, बी. एस. मंडलवार, व्ही. टी. खिल्लारे, मोहम्मद रफी, जवान दिलिप नारखेडे, एन. पी. भोकरे, मुरली आनकाडे, संतोष संगेवार, विकास नागमवाड, बालाजी पवार, प्रविण इंगोले, श्री. नांदुसेकर आणि श्री. राठोड यांचा समावेश होता. या पथकाचे कौतुक श्री. सांगडे यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT