file photo 
मराठवाडा

भावी जवानांची कुडकुडत्या थंडीत परीक्षा

गणेश पांडे

परभणी : देश सेवा, देशप्रेम हे आजच्या तरुणाईकडून केवळ मोबाईलच्या माध्यमातून व्यक्त होते., अशी प्रतिक्रीया सर्वत्र नेहमीच उमटते. मात्र, या विरुध्द देश सेवेची इच्छा असणारे अनेक तरुण कुडकुडत्या थंडीत वेगवेगळ्या शारिरिक चाचणीला सामोरे जात असल्याचे चित्र परभणीतील सैन्य भरतीप्रक्रियेमध्ये शुक्रवारपासून पहावयास मिळाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने भावी जवान आपल्या जीवाची बाजी लावण्याचे काम करत असल्याचे दिसून येते.

परभणी जिल्ह्यात ता. ४ ते १३ जानेवारी या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील उमेदवारांची नोंदणीत २० टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४ हजार ५०९ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परभणीसह नंदूरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड या नऊ जिल्ह्यातील जवळपास ६५ हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांना दिवस व वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेलाच या उमेदवारांना यावे लागत आहे. 

उघड्यावरच काढली रात्र
भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ४ हजार ५६८ उमेदवारांनी मैदानी चाचण्या दिल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. रात्री १२.४५ मिनिटांनी चाचणीसाठी उमेदवारांना मैदानात घेतले जात आहे. परजिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थांना परभणीत लवकरच यावे लागत असल्याने भरती प्रक्रिया सुरु होण्याआधी हजारो विद्यार्थी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मोकळ्या मैदानावर, शेतातमध्ये झोपलेले दिसत आहेत.

खासगी संस्थांकडून व्यवस्था
पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी जागो -जागी झोपलेले दिसत होते. परंतू, शनिवारी (ता.चार) काही खासगी संस्थांनी मोठ - मोठे शामियाने उभारून भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय केली आहे. काही ठिकाणी मुलांसाठी ६० रुपयाला जेवणांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सामाजिक संघटना, संस्थानी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. 


हेही वाचा व पहा : Video: ऑटोचालकांना पोलिसांकडून गुलाबपुष्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT