file photo  
मराठवाडा

मोफत प्रवेश प्रक्रियेलाही ‘कोरोना’ची धास्ती

नवनाथ येवले

नांदेड :  बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत प्रवेश अर्जांची सोडत प्रक्रिया मंगळवारी (ता. १७) राज्य स्तरावर करण्यात आली. महिनाभरापासून प्रतीक्षित असलेल्या पालकांच्या मोबाइलवर गुरुवारी (ता. १९) प्रवेशाचा ‘एसएमएस’ प्राप्त होणार आहे.दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे मोफत प्रवेश प्रक्रियेची लॉटरी प्रक्रिया लांबणीवर पडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राज्य स्तरावरून खबरदारी घेत मंगळवारी सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गुरुवारी शाळास्तरावर मोफत प्रवेशाच्या याद्या लावून पालकांना मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे सूचना करण्यात येणार आहेत.

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत पटसंख्येच्या तुलनेत २५ प्रमाणे मोफत प्रवेशासाठी आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील २४६ शाळांतील तीन हजार २५२ प्रवेशासाठी नऊ हजार ६६१ पालकांनी ऑनलाइन अर्ज केले. मोफत प्रवेशाच्या जाहीर प्रक्रियेनुसार गेल्या महिनाभरापासून पालक लॉटरीच्या प्रतीक्षेत होते.कोरोनामुळे यंदाची लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलण्याची चिंता पालकांतून व्यक्त करण्यात येत होती.

हेही वाचासोशल मीडियातून अफवा पसरवणे पडले महागात...
 
प्रवेशाची खात्री करण्याचे आवाहन 
मंगळवारी राज्य स्तरावरून सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एनआयसीकडून प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून गुरुवारी (ता. १९) दुपारनंतर पालकांना मोबाइलवर प्रवेशाचा एसएमएस प्राप्त होणार आहे. तांंत्रिक अडचणीअभावी एसएमसवर अवलंबून न राहता पालकांनी कोरोनाविषयी खबरदारी बाळगून गर्दी होणार नाही याची काळजी घेत शाळा स्तरावर लावण्यात येणाऱ्या याद्यांमध्ये प्रवेशाची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आता ३१ मार्चनंतरच प्रक्रिया
मोफत प्रवेश प्रक्रियेनुसार पालकांना आपल्या पाल्यांची प्रवेश निश्चिती मोबाइल एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार असून प्रवेश मिळालेल्या व न मिळाल्याचा माहिती एसएमएसद्वारे प्राप्त होणार आहे. त्यानुसार पालकांना ता. ३१ मार्चनंतरच तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दोन प्रतींमध्ये प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. छाननीसाठी समितीकडून पंधरा ते वीस दिवसांची मुदत देण्यात येते. पालकांनी ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांचे प्रस्ताव मंगळवारनंतर (ता. ३१) सादर करावयाचे आहेत.

मोफत प्रवेशावरही ‘कोरोना’ संकट
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर होऊ नये, शंकेचे निरसन करण्यासाठी सोशल मीडियाच्या व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधवा. या शिवाय कार्यालयात चौकशी करावयाची असल्यास प्रवेशद्वारामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करता येईल. मोफत प्रवेशाबाबत पालकांनी शाळा अथवा कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष हजर होऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT