file photo
file photo 
मराठवाडा

साडेतीन लाखांची सिगारेट जप्त

सकाळ वृत्तसेवा

पूर्णा (जि.परभणी) : पोलिसांनी व वि. केअर सामाजिक संस्था मुंबईच्या वतीने पूर्णा येथील सिगारेटच्या दुकानावर शनिवारी (ता.सात) दुपारी दीड वाजता छापा टाकला. यात देशी व विदेशी कोणत्याही प्रकारचे लेबल नसलेल्या सिगारेटचे एक हजार २०४ बॉक्स जप्त केले. ज्याची किंमत तीन लाख ६४ हजार ८१२ रुपये इतकी आहे. पूर्णा पोलिस ठाण्यात चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर कातुसिंह तमराकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन येथील सिफा ट्रेडर्स, फ्रेड्स एजंसी, तुळजाइ ट्रेडर्स, एस. के. ट्रेडर्स डॉ. आंबेडकर चौक पोलिस स्टेशन समोरच्या दुकानात शनिवार (ता. सात) दुपारी दीड वाजता केअर सामाजिक संस्था मुंबई व पूर्णा पोलिसांनी तपासणी केली. या वेळी दुकानांमधून देशी विदेशी सिगारेटचा एक हजार २०४ बॉक्स जप्त केले. ज्याची किंमत तीन लाख ६४ हजार ८१२ रुपये इतकी होते.


चार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
या छाप्यात पकडण्यात आलेल्या सिगारेटच्या पॅंकिंगवर केंद्रशासनाने ठरवून दिलेल्या योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटचे पाकीटे आढळून आले. यात आरोपी शेख फैसल शेख अफजल (रा. विजय नगर पूर्णा), शेख नइम शेख मस्तान (अजीज नगर पूर्णा) , माणिक बापूराव कदम (शिवाजी नगर पूर्णा), रिजवान खान अखिलखान (शास्त्री नगर पूर्णा) या चार आरोपी विरूध्द पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा ....

आगीत दोन घरे खाक
पूर्णा (जि.परभणी) : हिवरा (ता.पूर्णा) येथील शंकर पंडीत नादरे व गजानन पंडीत नादरे या दोन्ही भावाच्या घराला विद्युत तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने पडलेल्या थिलंग्याने आग लागली. त्यात घरातील संसारउपयोगी सर्व वस्तू, कापूस, धान्य सर्व काही जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (ता.सहा) रात्री घडली. या जवळपास सात लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.


शंकर पंडीत नादरे व गजानन पंडीत नादरे हे दोघेही शुक्रवारी (ता.सहा) रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घरी होते. अचानक विद्युत तारेची स्पार्किंग होत होती म्हणून बाहेर आले तर घरातील कापसाने पेट घेतला. क्षणामध्येच आगीचे लोळ वाढल्याने गावात गोंगाट झाला. मात्र, घरातील ज्वारी, गहू, हरभरा, मुग, उडीत, सोयाबीन आदी धान्यांनी पेट घेतला. ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र, आग विझविण्यात यश आले नाही. आगीत घरातील दोन्ही भावाचे संसार उपयोगी सर्व साहित्य भस्मसात झाले. दरम्यान, शनिवार (ता.सात) ग्रामस्थ व पंचाच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. त्यात दोन्ही भावाचे मिळुन एकूण सात लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

कदम यांचा मदतीचा हात
पंचनामा करण्यासाठी चुडावा पोलिस ठाण्याचे जमादार पंडीत पवार, तलाठी अंबोरे, सरपंच उत्तम नादरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सर्कल प्रमुख सुदाम ढोणे, राम भालेराव आदीं उपस्थित होते. चुडावा पोलिस ठाण्यात अकस्मात जळीत दाखल करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी नादरे कुटुंबाला भेट देत मदतीचा हात व धीर दिला आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT