Nanded Photo 
मराठवाडा

तीन दिवसांत साडेतीन हजार भाविकांची तपासणी

शिवचरण वावळे

नांदेड : नांदेडचा गुरुद्वारा हा शिख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहराची जगभरात ओळख आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी देशासह विदेशातून रोज शेकडो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. ‘कोरोना’मुळे देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्शवभूमीवर (ता.पाच ते सात) एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नगिनाघाट रोड येथील गुरूद्वारा मधील तीन हजार ७५५ भाविकांची नांदेड वाघाळा शहर महापालिका आरोग्य विभागाच्या चार टिमने थर्मल गनद्वारे कोरोना तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण असल्याचे आढळून आले आहे. त्यांना कसल्याही प्रकारचा ताप, सर्दी, खोकला अशी कुठलीही लक्षणे आढळुन आली नाहीत. गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या या सर्व भाविकांचे लंगर साहेब येथील मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. 

जिल्हा प्रशासन कामाला
जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना आहे त्या ठिकाणच्या रूममध्ये क्वारन्टाईनमध्ये राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सिंह बिसेन यांनी कळविली. जिल्हा प्रशासन कोरोनाचा कुठलाही धोका पत्करु इच्छित नाही. 

जिल्‍ह्यातील १७ रुग्‍णालयात तापसणी सुरु
त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वती खबरदारी घेत जिल्ह्यातील उपजिल्‍हा रुग्‍णालय व ग्रामीण रुग्‍णालय येथे ताप रुग्‍णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. हे रुग्णालय नांदेड जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हा रुग्‍णालय नांदेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, मुखेड, उपजिल्‍हा रुग्‍णालय, देगलूर, उपजिल्‍हा रुग्‍णालय, हदगाव, उपजिल्‍हा रुग्‍णालय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्‍णालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड, मुदखेड, नायगाव, उमरी अशा सर्व उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालयातील १७ ठिकाणी ताप रुग्‍णालय सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT