hingoli sakal
मराठवाडा

Hingoli News : हिंगोलीत कोरोनाचे तीन रुग्ण

पॉझिटिव्ह असलेला रुग्ण निघून गेल्याने उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील एक वृद्ध व इतर दोघे जण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची संभाव्य लाट सुरू झाल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले असून पुन्हा कोरोना चाचण्या सुरु झाल्या आहेत.

जिल्ह्यातील वरुड चक्रपान येथील एका संशयित वयोवृद्धाची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र, उपचार घेण्यापूर्वीच तो निघून गेल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पथकाने याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिली आहे. हा वृद्ध कोणालाही न सांगताच निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.

२५ डिसेंबर रोजी १८ जणांची आरटी पीसीआर चाचणी केली असता त्यात दोघे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्रात संभाव्य कोरोना लाटेच्या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांनी २१ व २२ डिसेंबर रोजी राज्यातील आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेची व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रात नवीन कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्हाभरात कोरोनाच्या लाटेमुळे खबरदारीच्या उपाययोजना आखुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी कोरोना रुग्णाच्या भरतीसाठी जिल्हा रुग्णालयातील डीसीएच- १ व डीसीएच २, औंढा रोड भागातील कोरोना केंद्र तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.त्याची जबाबदारीही आनेक डॉक्टरांवर सोपविली आहे. तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही आयसोलेशन वार्ड,ऑक्सीजनचा पुरवठा व कोरोना उपचारात्मक लागणारे सर्व साहित्य, साधनसामुग्री तयार ठेवण्याच्या सुचना दिल्या, जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबही सुरु करण्याच्या सूचना दिल्याने तात्काळ ही लॅब सुरू करण्यात आली आहे.

सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ७० वर्षीय वयोवृद्ध हिंगोली शासकीय रुग्णालयात ताप, सर्दी, श्रीकला साठी २२ डिसेंबर रोजी भरती करण्यात आला होता. या रुग्णाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असता त्याचा अहवाल २४ डिसेंबर रोजी आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आत्त्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु या वयोवृद्धाने उपचार घेण्याऐवजी निघून जाणे पसंत केले. बऱ्याच ठिकाणी पथकाने या संशयित रुग्णाची पाहणी केली. परंतु, आढळला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT