file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्याला कोरोना रुग्णांचा रविवारी जोरदार धक्का बसला. एकाच दिवशी जिल्ह्यातील निरनिराळ्या तालुक्यात १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात आणखी वाढ होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार (ता. २६) पासून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. २५) जिल्ह्यात नवा रुग्ण आढळून आला नाही. सध्या जिल्ह्यात ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३६ वर गेली आहे. रविवारच्या आगोदर जिल्ह्यात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २२ वर होता. परंतु, अचानक रविवारी (ता. २४) रात्री उशिरा आलेल्या आहवालात माखणी (ता. गंगाखेड) चार, ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील एक, माळसोन्ना (ता. परभणी) एक व परभणी शहरातील एक पोलिस कर्मचाऱ्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे सर्व प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीचा उपाय म्हणून ता. २६ ते २८ मे दरम्यान तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. परभणी शहर तसेच लगतच्या पाच किलोमीटर परिसरात व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे व त्या लगतच्या तीन किलोमीटर अंतराच्या परिसरातही संचारबंदी लागू राहणार आहे.

हेही वाचा व पहा :​ Video : सायरन वाजवून पोलिसांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा....


यांना मिळणार संचारबंदीतून सूट
या संचारबंदीतून शासकीय कार्यालयांतील कर्मचारी, त्यांची वाहने, औषधी दुकाने, शासकीय व खासगी दवाखाने, निवारगृहात व इतर ठिकाणी अन्न वाटप करणारे, अत्यावश्यक सेवेचे परवाना घेतलेले. वैद्यकीय आपत्कालीन सेवा, गॅस वितरक, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोलपंप वितरक, दूध विक्रेते (सकाळी सहा ते नऊ), खत वाहतूक करणारी वाहने, राष्ट्रीयीकृत बॅंका, केवळ रास्तभाव दुकानदार यांच्याकडून चालनाद्वारे पैसे भरणा करून घेणे यांना संचारबंदीतून सूट असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

२०५ संशयित रुग्णांचे स्वॅब प्रलंबित
जिल्ह्यात सोमवार (ता.२५) पर्यंत एक हजार ९११ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एक हजार ९४४ संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले आहेत. यातील एक हजार ६४७ रुग्णांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ३६ स्वॅब पॉझिटिव्ह आहेत. २०५ स्वॅब प्रलंबित आहेत. २२ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नाहीत, असा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे. सोमवारी (ता. २५) आणखी २५ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT