crime news crime news
मराठवाडा

लातूरात पालकानेच केला तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

दोनही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायाधिशांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

सकाळ वृत्तसेवा

दोनही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायाधिशांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

लातूर: येथे तीन अल्पवयीन मुलींचा पालक म्हणून सोंग घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला येथील न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील चंद्रकांत नामदेव वाघलगावे हा पीडितांच्या आईसोबत तिच्या संमतीने पती म्हणून राहत होता. मे २००७ ते ऑक्टोबर २०१७ या काळात वारंवार संधी मिळेल त्यावेळी पीडित मुलींना धमकी देऊन आणि मारहाण करून लैगिंक अत्याचार केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पिंपळखेडे यांनी करून आरोपीविरूरुद्ध दोषारोप दाखल केले होते. विशेष (पोक्सो) न्यायालयाचे न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालले. दोष सिद्ध करण्याकरिता सरकारपक्षाने एकूण नऊ साक्षीदारांचा तोंडी पुरावा नोंदविला होता. यामध्ये तीनही पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. इतर साक्षीदारमध्ये पीडितेची आई, पीडितीचे वय सिद्ध करणारे मुख्याध्यापक आणि पीडितेवर वैद्यकीय उपचारावरून अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही पुरावा महत्त्वाचा ठरला.

दोनही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायाधिशांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्या वतीने प्रकरण सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. एस. रांदड व विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश एस. महिंद्रकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. विद्या वीर व अ‍ॅड. अंकिता धूत यांनी सहकार्य केले. महिला पोलिस शिपाई सुमन हाळे व महिला पोलिस नाईक एस. के. जाने यांनी कोर्टाची पैरवी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT