Latur Police, Coronavirus 
मराठवाडा

लातुरात साडेतीनशे पोलिसांची रोज दोनदा तपासणी, कोरोनापासून सावधगिरी

हरि तुगावकर

लातूर ः कोरोनाच्या संसर्गापासून लातूरकरांना वाचविण्यासाठी सध्या पोलिस महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. टाळेबंदी व संचारबंदी असल्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवरच आहे. अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी देखील पोलिसांचेच हात पुढे आहेत. असे कर्तव्यावर असलेले पोलिस जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. रात्रंदिवस काम करणाऱ्या शहरातील साडेतीनशे पोलिसांपैकी एकालाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. यातूनच या सर्व पोलिसांची दररोज दोनदा पोलिस ठाण्यातच तपासणी केली जात आहे.

पोलिसांसोबतच २५ अधिकाऱ्यांची देखील अशीच तपासणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांची टाळेबंदी सुरू आहे. यात महत्त्वाची भूमिका शहरातील शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी, विवेकानंद चौक, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिसही यात मागे नाहीत. दररोज रात्रीची गस्त झाल्यानंतर पुन्हा सकाळी रस्त्यावर कर्तव्यासाठी हे पोलिस हजर राहत आहेत. टाळेबंदी, संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम हे पोलिस करीत आहेत.

एकीकडे नागरिकांना घरात बसण्याचा संदेश देण्यासोबतच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे कामही पोलिस करीत आहेत. समोर येणारा नागरिक कोरोना संसर्ग आहे की नाही माहिती नाही; पण त्याचा सामना मात्र पोलिसांना करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस मास्कचा वापर करताना दिसत आहे. पोलिसांवरील ताणही वाढत चालला आहे. कोरोनाचा संसर्गापासून सावधगिरी व वाढत्या तणावामुळे पोलिस आजारी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन शहरातील साडेतीनशे पोलिसांची ठाण्यातच दिवसातून दोनदा इन्फ्रारेड थर्मामीटरच्या साहाय्याने तपासणी केली जात आहे. येथील डॉ. अशोक पोद्दार व डॉ. चेतन सारडा यांनी हे इन्फ्रारेड थर्मामीटर पोलिसांना उपलब्ध करून दिले आहेत.


रात्रंदिवस काम करणाऱ्या साडेतीनशे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. यातून त्यांची दिवसातून दोनदा तपासणी करण्यात येत आहे. २५ पोलिस अधिकारी असून त्यांचीही अशीच तपासणी होत आहे. आतापर्यंत एकही ताप असलेला पोलिस रुग्ण समोर आलेला नाही. पन्नाशी ओलांडलेल्या पोलिसांना शक्यतो कार्यालयातच काम देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- सचिन सांगळे, पोलिस उपअधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT