1crime_33 
मराठवाडा

‘कोन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

सयाजी शेळके

उस्मानाबाद : `कोन बनेगा करोडपती`मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बुधवारी (ता. १८) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. `कोन बनेगा करोडपती` मधून मी राणाप्रताप सिंह कोलकत्ता येथून बोलत आहे. तुम्हाला चारचाकी गाडी व २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी खाते उघडण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर रक्कम जमा करावी लागेल. अशा प्रकारचा फोन चिलवडी (ता. उस्मानाबाद) येथील नीता अशोक डिसले यांना येत होता.

१५ जूनपासून त्यांना अशा प्रकारचा फोन येत होता. त्यावर विश्वास ठेवून श्रीमती डिसले आणि त्यांचा मुलगा रामराजे याने संबंधिताने दिलेल्या एसबीआय बँकेच्या वेगवेगळ्या १२ बँक खात्यावर पैसे भरले. सुमारे तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्यांनी भरली. त्यानंतरही श्रीमती डिसले यांना संबंधीत व्यक्तीने पुन्हा फोन करून दीड लाख रुपये भरल्यानंतर २५ लाख रुपये व गाडी घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर डिसले यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. निती डिसले यांनी बुधवारी (ता.१८) दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Controversy News : पुण्यात महापौरांचा हेडगेवारांना हार, शाहू महाराजांना केवळ नमस्कार? कोल्हापुरातून निषेधाची मागणी

Urfi Javed Viral Video: फॅशनच्या नावाखाली उर्फीने चक्क केकचा बनवला ड्रेस, पाहा व्हायरल व्हिडिओ

Thomas Candy : इंग्लंडमध्ये जन्म, पण मराठी भाषेसाठी ५० वर्षे काम; विरामचिन्हांच्या जनकाचं स्मारक दुर्लक्षित

Success Story: AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार! २ वर्षांनंतर युवतीच्या घशाखाली उतरला सुखाचा घास; १० तासांची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

SCROLL FOR NEXT