1crime_33 
मराठवाडा

ऑटोमोबाईलच्या दुकानात तीन लाखांचा गांजा, लातूर जिल्ह्यातील मुरूडमध्ये तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

लातूर : मुरूड (ता.लातुर) येथील एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर शनिवारी (ता. १९) पहाटे पोलिसांनी छापा टाकून ५१ किलो गांजासह तिघांना अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या विशेष पथकासह मुरूड व गातेगाव पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे मुरूड येथे खळबळ उडाली आहे. मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे), गातेगावचे सहायक पोलिस निरीक्षक विलास नवले व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. जी. राठोड यांच्या संयुक्त पथकाला मुरूड येथील मुरूड ते लातूर रस्त्यावरील ओमसाईराज ऑटोमोबाईल्स या दुकानात गांजा असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून पथकाने शनिवारी पहाटे तीन वाजता या दुकानावर छापा टाकला. छाप्यात तीन पोत्यांमध्ये तीन लाख सहा हजार रूपये किंमतीचा ५१ किलो बी मिश्रीत गांजा आढळून आला. या गांजासह व त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ व मिनी व्हॅन ही दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. दुकानाचे मालक गोविंद दिगांबर खोसे (वय ३५, रा. माटेफळ, ता. लातूर) याला गांजाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने युवराज तात्याराव काळे (वय ३०, रा. दत्तनगर, मुरूड) व सुनिल रोहिदास शिंदे (वय २३, रा. मांडवा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) हे दोघे बाहेरगावाहून मिनी व्हॅनमधून (एमएच २५ एएल ९०१४) गांजा घेऊन आल्याचे सांगितले.

त्यानंतर हे दोघे आवश्यकतेनुसार माझ्या मालकीच्या स्कॉर्पिओमधून (एमएच ०४ बीएन ५७१५) हा गांजा लातूर येथे नेऊन विक्री करतात, अशी माहिती खोसे यांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी गोविंद खोसे याच्यासह युवराज काळे व सुनिल शिंदे यांना अटक केली. या प्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम वीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे पुढील तपास करत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Constituency Delimitation : खासदारांची संख्या ५४३ वरून थेट ८५० होणार? काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर थेट निशाणा

Viral Video: बाल्कनीतून पडलेला कुत्रा विजेच्या खांबावर अडकला; तरुणाने जीवाची पर्वा न करता केली सुटका, व्हिडीओ व्हायरल

Sharad Pawar: काँग्रेसची थेट शरद पवारांवर टीका! डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन इतिहासच काढला

IND vs NZ 2nd Test Live: टीम इंडियाचं काही खरं नाय... न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सापळा रचून ठेचले; गौतम गंभीरचं टेंशन वाढले, दुसऱ्या दिवशी असं नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Faction : इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार गैरहजर राहणार, निलेश लंकेनीही ऐनवेळी बदलला निर्णय

SCROLL FOR NEXT