crime against girl esakal
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : डिघोळ तांडा (ता.सोनपेठ) (Sonpeth) येथील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (ता.१२) घडली होती. या घटनेनंतर पीडितेने विषारी औषध पिले होते. त्यात सोमवारी (ता.२०) लातूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान (Crime Against Girl) तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा (Parbhani) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस याच गावातील तिघांनी रविवारी (ता.१२) दुपारी एक ते पाच वाजेच्या सुमारास फोन करुन पडक्या शाळेत बोलवुन घेतले होते. त्या ठिकाणी तिघांनी तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेमुळे हादरलेल्या पीडितेने मंगळवारी (ता.१४) विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी तिला अंबाजोगाई (जि.बीड) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पंरतू, तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविण्यात आले. परंतू तिचा सोमवारी (ता.२०) मृत्यु झाला. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी सोनपेठ पोलीसात तक्रार दाखल केली. त्यावरुन सोनपेठ पोलीसांनी तीन आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT