file photo 
मराठवाडा

विनापरवाना वर्गणी गोळा केल्यास गणेश मंडळांना तीन महिने कैद

सुषेन जाधव
  • शहरासह जिल्ह्यात केवळ 879 गणेश मंडळांनीच घेतली परवानगी 
  • शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील मंडळांवरही होणार कारवाई 

औरंगाबाद : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली खरी; परंतु वर्गणीसाठी परवाना घेतला नसेल तर तसेच खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला नसेल तर मंडळाच्या सदस्यांना तीन महिने कैदेची शिक्षा किंवा वर्गणीतून गोळा केलेल्या रकमेच्या दीडपट दंड धर्मादाय कार्यालयात भरावा लागणार आहे.

नोंदणी न करता गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या, परवाना नसताना वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळांविरोधात महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार (गंजेवार) यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. धर्मादाय कार्यालयातर्फे गणेश मंडळांना दोन सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र आजवर केवळ 879 मंडळांनी धर्मादाय कार्यालयाचा नोंदणी परवाना घेतला आहे. त्यामध्ये 270 ऑनलाइन परवाने आहेत, तर ऑफलाइन शहरातील 531 गणेश मंडळे व ग्रामीणमधील 38 गणेश मंडळांचा समावेश आहे. शहरातच गृहनिर्माण संस्थांतील गणपती, गल्लोगल्लीतील, शासकीय कार्यालये आदी ठिकाणच्या गणेश मंडळांची पाच हजारवर संख्या असतानाही केवळ 879 मंडळांनी नोंदणी केल्याने कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम धर्मादाय कार्यालयाने भरला आहे.

शासकीय कार्यालयातील गणेश मंडळांनाही दंड

एमआयडीसी कार्यालये, भारतीय खेळ प्राधिकरण, ऑरिक कार्यालये, पोलिस आयुक्तालय, पोलिस कॉलनी, एसटी डेपो, एसटी कार्यशाळा, शासकीय रुग्णालय (घाटी) आदींसोबतच इतर शासकीय कार्यालयांतील एकाही गणेश मंडळाने धर्मादाय कार्यालयाकडे वर्गणी गोळा करण्याचा परवाना घेतला नसल्याचे धर्मादाय उपायुक्त प्रणिता यांनी सांगितले.

अजूनही वेळ गेलेली नाही

परवान्यासाठी अजूनही वेळ गेलेली नसून www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइनसह कार्यालयात ऑफलाइन नोंदणी करता येणार असल्याचेही उपायुक्त प्रणिता यांनी सांगितले. हा नोंदणी परवाना सहा महिन्यांसाठी वैध असेल. मंडळाला परवाना मिळाल्यानंतर दोन महिन्यात हिशोब सादर करावा लागणार आहे; तसेच वर्गणीतील खर्चाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम धर्मादाय कार्यालयाच्या सार्वजनिक न्याय निधीत (पीटीए) जमा करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी

नोंदणीसाठी गणेश मंडळातील सदस्यांचे 18 पेक्षा अधिक वय, सदस्यांचा गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा ठराव, ठरावावर स्वाक्षऱ्या असणाऱ्यांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, जिथे गणपती बसविणार असेल त्या जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र व वीजबिलाची प्रत (नगरपालिकेच्या जागेवर असल्यास नगरपालिकेचे प्रमाणपत्र); तसेच गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या खर्चाचा अंदाजित तपशील, गतवर्षी केलेल्या खर्चाचा हिशोब आदी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करून परवाना घ्यावा लागेल. सामाजिक भान ठेवून मंडळांनी सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र यासाठी नागरिकांना वर्गणीसाठी जबरदस्ती करू नका असेही स्पष्ट केले आहे. निमशासकीय संस्था, शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपापल्या इच्छेनुसार काही रक्कम गोळा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली असेल तरीही यासाठी परवानगी लागेलच. नसल्यास धर्मादाय कार्यालयातर्फे थेट कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला मिळाली गती - मुरलीधर मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT