शस्त्रक्रियांचा टाका घट्ट sakal
मराठवाडा

स्थलांतर केल्यानंतर शस्त्रक्रियांचा टाका घट्ट

कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांवरील उपचारामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांवरील उपचारामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष आणि शस्त्रक्रियांत पडलेला खंड, तसेच स्थलांतरित रुग्णालयातील विस्कळीत आरोग्य सेवा याला आता पूर्णविराम भेटला आहे. मुळ इमारतीत जिल्हा रुग्णालय आणल्यानंतर इथेही शस्त्रक्रियांचा टाका घट्ट होत आहे.

बुधवारी (ता. १५) या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने दुर्बिणीद्वारे दोन गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांना सिव्हिलमध्येही शस्त्रक्रिया होतात असा विश्वास निर्माण होत आहे.

दीड वर्षांपूर्वी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या मुळ इमारतीमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु झाले. तर, नाळवंडी नाका भागातील एका आयुर्वेद महाविद्यालयात जिल्हा रुग्णालय सुरु झाले. मात्र, कोरोनामुळे नियोजीत शस्त्रक्रिया बंदच होत्या. तर, इतर रुग्णांचीही हेळसांड होत होती. मात्र, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार घेतल्यानंतर डॉ. सुरेश साबळे यांनी स्थलांतरित सिव्हिलमध्येही नियोजीत शस्त्रक्रिया सुरु केल्या होत्या. दरम्यान, आता आठवडाभरापूर्वी सिव्हिल मुळ इमारतीत आले. या ठिकाणीही नियमित उपचारासह अत्यावश्यक आणि नियोजित शस्त्रक्रिया सुरु झाल्या. पण, बुधवारी सिव्हिलच्या टिमने एक पाऊल पुढे टाकले आहे.

अॅपेंडीक्सचा त्रास असलेली शहरातील २० वर्षीय महिला व पित्ताशयाचा त्रास असलेली ३० वर्षीय महिला सिव्हिलमध्ये शरिक झाल्या. या दोघींना शस्त्रक्रिया गरजेच्या होत्या. पण, त्या दुर्बीणव्दारे कराव्या लागत होत्या.

डॉ. सुरेश साबळे यांच्यासह डॉ. अभिषेक जाधव, डॉ. माजेद, डॉ. शापे, डॉ. संदीप पाटील, डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. राम आवाड, अधिसेविका रमा गिरी, संगिता दिंडकर , जयश्री उबाळे, मिता लांबोरे, श्रीराम माने यांच्या चमूने या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेचे साहित्य सिव्हिलमध्ये नव्हते. मात्र, गरज असल्याने डॉ. साबळे व डॉ. जाधव यांनी आवश्यक साहित्याची उपलब्धता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT