Marathwada Sakal
मराठवाडा

पिक विमा सरसकट मिळण्यासाठी,शेतकऱ्यांचा दीड तास रास्ता रोको,

लेखी आश्वासनानंतर रस्ता रोको मागे

सय्यद अतिक

हिंगोली : शेतकऱ्यांना (Farmers) शेतातील नुकसान भरपाईचा सरसकट विमा पिक विमा मेळावा यासाठी कामठा (Kamatha) फाटा येथे शुक्रवारी रास्तारोको करण्यात आला. कृषी अधिकारी यांच्या लेखी पत्र आल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला आहे.

कळमनुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नव्हता सरसकट पिक विमा मेळावा यासाठी शुक्रवार कामठा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको केला होता या रस्ता रोको मध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होऊन ठीक ठिकाणी वाहनांची रांगा लागल्या होत्या. तब्बल दीड तास रास्ता रोको केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी बी. एच. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना पिक विमा योजना माहिती दिली परंतु शेतकऱ्यांनी लेखी द्यावे या मागणीवर ठाम बसल्याने शेवटी जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी श्री कच्छवे यांना शेतकऱ्यांना सरसगट विमा पिक विमा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला.

यावेळी माजी आमदार गजानन घुगे, विनायक भिसे रावसाहेब अडकिने, पराग आडकिने, अभिजीत देशमुख, विजय गावंडे , भरत देसाई ,गजानन देशमुख, बाळू पाटील कल्याणकर ,साजीद पठाण, सुरेश नागरे, सुशील बोंढारे सोपान पाटील बोंढारे ,सोनू पाटील वाघमारे ,नितीन कदम कालिदास पांडे, नाना शिरसागर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार मंडळ अधिकारी आनंदराव सुळे, तलाठी श्री. मोरे यांच्या सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रास्ता रोको चे संयोजक अक्षय देशमुख यांनी शेतकऱ्या बाबत सविस्तर विषय मांडून प्रशासनाच्या पिक विमा बाबत उदासीनता सांगून नाराजी व्यक्त केली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बदनापोड फौजदार अच्युत मुपडे, जमादार सुरेश नागरे, संजय मार्के ,पंढरी चव्हाण, यासह पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आले

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

Navi Mumbai: नवी मुंबईतील वृद्धाची कोट्यवधींची फसवणूक! डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दीड महिना मानसिक छळ

Daund Kidnapping: दौंडमध्ये तरुणीचे मध्यरात्री अपहरण; माजी नगराध्यक्ष बादशहा शेखसह ११ जणांवर अपहरण, दरोडा, विनयभंगासह अतिउग्र गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT