Tuljabhavani Mata1
Tuljabhavani Mata1 
मराठवाडा

तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा, आज सहावी माळ

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापुजा बुधवारी (ता.२१) बांधण्यात आली. मातेच्या नवरात्रात सहाव्या माळेस मुरली अलंकार महापुजा बांधण्याची पारंपरिक पद्धत आहे. तुळजाभवानी माता मुरली घेऊन वाजविण्याचे रूप दाखविण्यात येते. तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस बुधवारी सकाळी सात वाजता अभिषेक झाल्यानंतर पुजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या मस्तकी चंदनाचा लेप लावण्यात आला.

कपाळावर कुंकू लावण्यात आले. मूर्तीवर महावस्त्र परिधान केल्यानंतर दागदागिने घालण्यात आले. त्यानंतर पुजा बांधण्यात आली. यंदा कोरोनाच्या आजारामुळे पुजेच्या वेळेत अमुलाग्र बदल झालेले आहेत. सकाळी अकरा वाजता दरवर्षी पुजा बांधली जाते मात्र यंदा केवळ एकच अभिषेक असल्याने पुजा लवकर होत असल्याने अलंकार पुजा लवकर बांधण्यात येत आहे. तुळजाभवानी मातेच्या वेगवेगळ्या पुजा या राजेशाही पद्धतीने मांडल्या जातात. तसेच तुळजाभवानी मातेचे वैभव या पूजातुन दाखविले जाते.


कोरोनामुळे भाविक वंचितच
तुळजाभवानी मातेच्या विविध पुजा नवरात्रात बांधण्यास सुरूवात झालेली आहे. तथापि भाविक मात्र प्रत्यक्षात तुळजा भवानी मातेच्या पुजेचे दश॔न घेऊ शकत नाहीत.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT