Sadabhau Khot Umarga visit

 

esakal

मराठवाडा

Sadabhau Khot : अतिवृष्टीग्रस्त भागात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा, भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

Ex-Minister Sadabhau Khot inspects flood-affected areas in Umarga : सदाभाऊ खोत यांची उमरग्यात पाहणी, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

उमरगा : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता.२७) उमरगा तालुक्यातील येणेगुर, दाळिंब,  येळी आदी भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूरज आबाचने यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार खोत यांनी सांगितले. मंडळ अधिकारी मनोज यमुलवाड, ग्राम महसूल अधिकारी रंजना राठोड, सहाय्यक कृषि अधिकारी शेख, आविष्कार भालेराव, सदानंद इंगळे यांच्यासह शेतकरी महेश सोनवणे, मेहबूब मुल्ला, महादेव बिराजदार, सतीश जाधव, शरण बिराजदार, अल्ताफ मुल्ला, अजीम खजुरे उपस्थित होते.

दरम्यान आमदार खोत यांनी वैशाली चॅरिटेबल ट्रस्टला भेट दिली. ट्रस्टच्या वतीने  भारतीय संविधान व बुद्ध आणि धम्म ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. अजय कांबळे, उपाध्यक्ष अमोल कांबळे व संचालक मंडळ, निवृत्ती पवार, शिवलिंगप्पा माळी, व्यंकटराव मोरे, प्रा. सुरवसे, भीमराव कांबळे, रोहिदास कांबळे, संदीपान कांबळे, नागनाथ कांबळे, बबन कांबळे, अभिमन्यू कांबळे, विशाल कांबळे, हरीश कांबळे, बाबा पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Eknath Shinde: राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Latest Marathi News Live Update: नालासोपारा पूर्वेमधील कपड्यांच्या दुकानाला लागली आग

TCS Layoffs: 'टीसीएस'मध्ये खरंच किती कर्मचाऱ्यांची कपात झाली? 12000 की 60000?

Ravindra Mangave : कारभारातील नाराजीमुळे अध्यक्ष ललित गांधींचा राजीनामा; रवींद्र माणगावे प्रभारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT