file photo
file photo 
मराठवाडा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पाथरी (जि. परभणी) : चाकूचा धाक दाखवून बळजबरीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ तयार केला. तसेच सदरील व्हिडीओ व्हाट्स ॲपवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना लिंबा (ता. पाथरी) व अनेक ठिकाणी घडली. पीडितेच्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. दहा) एकावर पाथरी पोलिसात पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

पोस्कोनुसार गुन्हा दाखल
 पाथरगव्हाण (बु) (ता. पाथरी) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने पाथरी पोलिसात दिलेल्या फिर्यादेवरून पाथरी तालुक्यातील तुरा येथील अनिल अर्जुन मोरे याने अल्पवयीन फिर्यादी मुलीस चाकूचा धाक दाखवून लिंबा शिवारात अत्याचार केला. त्याचा मोबाईलवर व्हिडीओ तयार करून तो  व्हिडीओ व्हाट्स ॲपवर व्हायरल करतो, अशी धमकी देत फिर्यादीसोबत अनेक ठिकाणी सतत अत्याचार केला.  या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसात मंगळवारी रात्री अनिल अर्जुन मोरे याच्या विरोधात पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डी. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर बोधगिरे हे करीत आहेत.
...
हेही वाचा...मोक्कातील ‘त्या’ आरोपींना पोलिस कोठडी


तरुणीचा शारीरिक, मानसिक छळ
पूर्णा : ब्युटीपार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून मुंबई येथील एका २४ वर्षीय तरुणीचा  शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध बुधवारी (ता. ११) पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई येथील एका २४ वर्षीय तरुणीस पूर्णा येथे मोठे ब्युटीपार्लर टाकून देतो, असे म्हणत दोन ऑक्टोबर ते  ता.एक डिसेंबर या काळात हिंगोली गेट परिसरातील घरात फिर्यादीशी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करीत जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी एका महिलेसह शुभम धनराज गायकवाड (रा. विडा, ता. केज, जि. बीड), गणेश पांचाळ (रा. पूर्णा) व शुभम याचा चुलत भाऊ ज्याचे नाव माहीत नसून या चार जणांविरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले  करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT