parbhani sakal
मराठवाडा

Parbhani : आधुनिक युगात बहुरूपी कला पावतेय लोप ; परंपरा जपणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ,शासनाने दखल घ्यावी

महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका करतात. यामध्ये पोलिसांपासून ते देवी-देवतांची रूपे घेऊन नागरिकांचे मनोरंजन करत असतात. परभणी शहरासह ग्रामीण भागातही अनेक सणांच्या वेळी येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीशी संबंधित अनेक प्रकारच्या कला वापरून बहुरूपी आपली कला सादर करतात.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका करतात. यामध्ये पोलिसांपासून ते देवी-देवतांची रूपे घेऊन नागरिकांचे मनोरंजन करत असतात. परभणी शहरासह ग्रामीण भागातही अनेक सणांच्या वेळी येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीशी संबंधित अनेक प्रकारच्या कला वापरून बहुरूपी आपली कला सादर करतात. पूर्वी या कलाकारांना सुगीचे दिवस होते; मात्र आता मोबाईलमुळे या कलाकारांची कला लोप पावत चालली असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात बहुरूपी कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती. सध्या काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत आहे. परभणी जिल्ह्यात अनेक कलाकार हे देवी-देवता, पोलिसांचा वेश करून बाजारपेठेत, दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत असतात. लहान वयापासून बहुरूपी म्हणून गावागावात जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात, तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या, कोणाची सासुरवाडी कोठे आहे आदींबाबत माहिती बहुरूपी ठेवत आले असल्याचे या कलाकारांनी सांगितले.

समाजाचा रोष

मोबाईलच्या रूपात करमणुकीची साधने थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषालादेखील अनेकदा सामोरे जावे लागते. निरनिराळी सोंगे करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

आदिवासी संस्कृतीनुसार कला सादर करताना समाजासमोर शिक्षण, आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांत बहुरूपींना दान देण्याचे प्रमाणही कमी झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

— केशव सापटा, बहुरूपी कलाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT