file photo 
मराठवाडा

घरातून दारात...दारातून घरात प्रवास ठरतोय त्रासदायक, कशामुळे? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड :  घरातून दारात आणि दारातून घरात अशी अवस्था अनेक कुटुंबातील सदस्यांची लाॅक डाऊनच्या निमित्ताने झाले आहे. घरात बसायचे तरी किती? वेळ जाता जात नाही. असाही सूर कानी पडू लागले आहेत. दरम्यान फावल्या वेळेचा फायदा काही कुटुंबातील सदस्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अडगळीत पडलेले कॅरम, बुद्धीबळ, पत्ते आता बाहेर काढले गेले आहेत.

अनेकांची झाली कोंडी
सकाळी उठल्यापासून दिवसभर नेमके करायचे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. २२ मार्चच्या एक दिवसाच्या जनता कर्फ्यूवेळी लोकांना घरातून बाहेर न पडणे फारसे अवघड गेले नाही. मात्र लाॅक डाऊनचे दिवस जसे वाढू लागले आहेत तसे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची चिंता वाढू लागली आहे. एक तर इतके दिवस घरी बसून राहण्याची फारशी कुणाला सवय नाही. उद्योग, व्यापार, नोकरी, व्यवसाय सर्व काही बंद असल्याने बाहेर पडूनही काही उपयोग नाही. सकाळ-संध्याकाळ बाहेर फिरायला जायचेही बंद झाले. या सगळ्यामुळे अनेकांची कोंडी होऊ लागली आहे. 

टीव्ही तरी किती वेळ बघायचा?
घरी बसून टीव्ही किती वेळ बघायचा? न्यूज चॅनल्स पाहावे तर कोरोना व्हायरसच्या बातम्यांशिवाय दुसरे काही पाहावयास मिळत नाही. शिवाय बहुतांश सिरियल्सच्या शुटींग बंद झाल्याने पाहिलेले भागच पुन्हा पाहावे लागत आहेत. एका जागेवर बसून कंटाळा आल्यानंतर पुन्हा दारात येऊन बसायचे. दारात आल्यानंतर पुन्हा हाती मोबाईल, व्हाटसअपवरील मॅसेज पाहिल्यानंतर पुन्हा तिकडच्या थोड्या गप्पा, रस्त्यावर कोणत्या चौकात पोलिसांनी कोणाला ठोकले याची चर्चा, दुपारचे भोजन आटोपल्यावर उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी गल्लीबोळात तसेच काॅलनीत थोडा सन्नाटा पसरतो. यात चुकून वीज पुरवठा खंडीत झालाच तर पुन्हा सगळे दारात. दुपारी तीन ते पाच या वेळेत गल्लीबोळात शांतता असते. पाचनंतर पुन्हा दारात चर्चेचा फड रंगतो.  कसा तरी वेळ घालवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

घरच्या कामात पुरुषांनाही रस यायला लागला
काही कुटुंबात लाॅक डाऊनच्या काळात सदुपयोग केला जात आहे. घरात कॅरम, पत्ते, बुद्धीबळ याचे डाव रंगत आहेत. काहीजण घर उरकायला घेत आहेत. बरेच दिवस करेल करेल म्हणतो, अशी कामे पुरुषांनी हाती घेतली आहेत. काहीजण आपले पूर्वीचे छंद जोपासायला सुरुवात केली आहे. कुणी पुस्तके वाचतो. कुणी चित्रे काढतोय. कुटुंबासोबत किचनमध्येही आता पुरुष लुडबुड करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT