Accident News  Esakal
मराठवाडा

Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शिक्षकांना जोरदार धडक

सकाळ डिजिटल टीम

परभणीच्या मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 222 कल्याण ते निर्मल रस्त्यावर आज सकाळी ट्रकने दुचाकीला उडवल्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण आपघातामध्ये दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मानवत येथील शकुंतला विद्यालयातील रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ हे दोन शिक्षक आपल्याने दुचाकीने शाळेकडे येत असताना पाथरीहून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरुन फरार झाला आहे.

रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दोन्ही शिक्षक मानवत येथील शकुंतला विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कदम आणि राऊळ हे दोघेही शिक्षक दुचाकीवरून आज पहाटेच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते.

मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही शिक्षकांची जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT