Tuljabhavani Mata, Tuljapur
Tuljabhavani Mata, Tuljapur esakal
मराठवाडा

'आई राजा उदो उदो'च्या गजरात तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे (Tuljabhavani Mata) सीमोल्लंघन शुक्रवारी (ता.१५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पार पडले. हळद-कुंकवाची उधळण, 'आई राजा उदो उदो'च्या गजरात सीमोल्लंघन झाले. तुळजाभवानी मातेच्या पलंग पालखी, मायमोरताबची मिरवणूक (Osmanabad) गुरूवारी (ता.१४) मध्यरात्री शुक्रवार पेठेतुन निघाली. भगत कुटूंबियांच्या पारंपारिक जागेतून पालखीची मिरवणूक निघाली. तसेच शुक्रवार पेठेतील आडेकर कुटूंबियांच्या (Tuljapur) घरासमोरील पलंग पारावरून पलंगाची मिरवणूक निघाली. तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने सीमोल्लंघनासाठी (Dasara Festival) पलंग आणि पालखी वाल्यांना निमंत्रित करण्यात आले. शुक्रवार पेठ, किसान चौकी , आर्य चौक मार्गे पलंग, पालखी ची मिरवणूक पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मंदिरात आली. तुळजाभवानी मंदिरात गुरूवारी मध्यरात्री दुधाचे अभिषेक झाले. त्यानंतर तुळजाभवानी मातेस १०८ नववारी साड्यांचे दिंड बांधण्यात आले.

यावेळी भोपे पुजारी संजय कदम, सचिन पाटील, मुकूंद कदम, शिवराज पाटील, रूपेश कदम आदी उपस्थित होते. तसेच भोपे कुटूंबियांतील कदम, पाटील, सोंजी, परमेश्वर यासह अनेक सदस्यांनी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजीबुवा , महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजीबुवा आदींनी दिंड बांधण्याचे काम केले. पहाटे तुळजाभवानी मातेची पालखी सीमोल्लंघन पारावर आल्यावर पालखीच्या दांड्यास गादी लावण्यात आली. तुळजाभवानी मातेचे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धुपारती झाली. त्यानंतर सिंहासनावरील तुळजाभवानी मातेची मूर्ती पालखीमध्ये अधिष्ठीत करण्यात आली. तसेच त्यानंतर सीमोल्लंघन पार पडले. सीमोल्लंघन पारावर साखर भात, करंजी आदीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दीक्षित घराण्याच्या वतीने दुधाच्या पायसचा नैवेद्य दाखविण्यात आला. सीमोल्लंघन पारावर तुळजाभवानी मातेस आरत्यांनी ओवाळण्यात आले. त्यानंतर तुळजा भवानी मंदिरातील सिंहाच्या गाभार्यात भिंगारचा पलंग नेण्यात आला. देवीची मंचकी निद्रा आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चालू झाली. येत्या २० ऑक्टोबरपर्यत देवीची मंचकी निद्रा चालू राहिल. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, प्रियंका दिवेगांवकर, उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे, तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजाभवानी मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्देश्वर इंतुले, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके आदींच्या उपस्थितीत पालखीचे मानकरी अभिषेक भगत, जितेंद्र भगत, दिवटीचे मानकरी राम शंकर सूतार, मायमोरताबचे मानकरी अंबादास उत्तरेश्वर क्षीरसागर, सागर क्षीरसागर यांचा भरपेहराव आहेर देऊन सत्कार करण्यात आला.

सीमोल्लंघन पारावर फुलांची सजावट

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनासाठी पारंपरिक गोंधळी कुटूंबियांतील सदस्य राजाभाऊ गायकवाड, विजय मोरे, अनंत रसाळ, प्रशांत मोरे, श्रीकांत रसाळ, चंद्रकांत मोरे, नाना रसाळ, संतोष रसाळ, दिलीप रसाळ, भैय्या गायकवाड आदींनी तुळजाभवानी मातेचे संबळ हे रणवाद्य वाजविले. तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन पारावर फुलांची सजावट करण्यात आली. तसेच नगारा, घाटी यांचा निनाद करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT