Tuljabhavani Mandir esakal
मराठवाडा

तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास मारहाण धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास अडवून मारहाणीची धमकी

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.तुळजापूर) : तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास अडवून मारहाणीची धमकी दिल्या प्रकरणी एक जणाविरूद्ध गुन्हा बुधवारी (ता.१९) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संकेत अनिल शिंदे आहे. सदरची घटना तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावर १८ जानेवारीस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीसांनी सांगितले की, तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) यापूर्वी २ जानेवारी रोजी दर्शन मंडपाचा पहिला आणि तिसरा मजला भाविकांनी भरलेला होता. त्यावेळी शिंदे याने दर्शन मंडपातील हाॅलमध्ये भाविक घुसवित असताना तेथील कार्यरत असलेले सुरक्षारक्षक दीपक गंभीरे यांनी भाविकांना अडवले. (Tuljabhavani Temple Security Guard Beaten In Tuljapur Of Osmanabad)

यावेळी सुरक्षारक्षकास शिंदे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर सुरक्षारक्षक गंभीरे यांना धक्काबुक्की करून मारहाण (Tuljapur) केली. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. शिंदे यांनी सुरक्षारक्षकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच धमकी दिली. सुरक्षारक्षक सागर भिसे हे सुरक्षारक्षक गंभीरे यांच्यासोबत होते. या संदर्भात कॅमेरामधील चित्रीकरणाचे अवलोकन केले. तसेच तहसीलदार तथा प्रशासन व्यवस्थापक योगिता कोल्हे यांच्या आदेशावरून संकेत शिंदे यास मंदिरात तीन महिने बंदी होती. शिंदे यांनी व्यवस्थापकांच्या बंदी आदेशाचे पालन केले नाही. तसेच सुरक्षारक्षकास गावाकडे जात असताना धमकी दिली. या संदर्भात मंदिराचे सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या फिर्यादीनुसार संकेत अनिल शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा बुधवारी दाखल करण्यात (Osmanabad) आला आहे. (Tuljabhavani Temple Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: एसी लोकलची संख्या वाढणार, १२० एसी लोकल रुळांवर धावणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; पाहा वेळापत्रक

गुलाबी साडी ते बॉलिवूड! संजू राठोडच्या गाण्याने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, Viral Video

Jyoti Waghmare: उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे...वरातीमागून घोडे! संजय राऊत दुतोंडी गांडूळ; खासदार ज्योती वाघमारे यांनी केली टीका

Latest Marathi News Update : नसरापूर प्रकरणात उद्या शिक्षेचा निकाल; दोषी भीमराव कांबळे याला फाशी की जन्मठेप?

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

SCROLL FOR NEXT