Vaishnav And Gaurav Bahule 
मराठवाडा

आईने दोघा मुलांना घरी जायला सांगितले, पण शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी येथील दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.एक) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी येथे ज्ञानेश्वर बहुले हे बटाईने शेती करतात. त्यांची पत्नी कविता या रविवारी सकाळी धनगरपिंपरी शिवारातील शेतात कापूस वेचण्यासाठी गौरव व वैष्णव या मुलांना सोबत घेऊन गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेनंतर आईने मुलाला आता तुम्ही घरी जावे, असे सांगितले होते. त्यानंतर गौरव ज्ञानेश्‍वर बहुले (वय १२) व वैष्णव ज्ञानेश्‍वर बहुले (८) वर्षे हे शेतातून गावात घरी जाण्यासाठी निघाले.

रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात डोकावून पाणी पाहण्यासाठी गेल्याने दोघे भाऊ पाण्यात बुडुन मरण पावले आहे. धनगरपिंपरी शेतशिवारातील गट नंबर २२० मधील शेतकरी शरद जेठमलानी देसरडा यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बहुले यांना गौरव व वैष्णव ही दोनच मुले होती. दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढुन  अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. या घटनेची वार्ता परिसरात सर्वत्र पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण शेळके, सतीश देशमुख,रमेश वनवे हे पोलिस कर्मचारी पंचनामा करत आहेत. अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT