Latur Accident News 
मराठवाडा

Latur|अहमदपूरमधील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

एक भाऊ पोलिस दलात शिपाईपदावर, तर दुसरा भाऊ लातूरला मार्केटिंग व्यवसाय करित होता.

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील दोन सख्ख्या भावांचा पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. रोकडा सावरगाव येथील रहिवासी व सध्या सोलापूर येथील मुख्यालयात पोलिस काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले दयानंद अण्णाराव बेल्लाळे ( वय 30 ), पत्नी दीपाली अण्णाराव बेल्लाळे ( वय २५ ), लातूरला (Latur) मार्केटिंग व्यवसाय करणारे त्यांचे भाऊ सचिन आण्णाराव बेल्लाळे (वय ३२), भावजय स्वाती सचिन बेल्लाळे, मुलगी त्रिशा ( ८) व मुलगा श्लोक ( एक ) आपल्या मारूती कारने सोमवारी (ता.चार)  पंढरपूरहून दर्शन घेऊन सोलापूरकडे येत होते. (Two Brothers Of Ahmedpur Died In Accident In Solapur)

दुपारी तीनच्या दरम्यान मोहळजवळील सारोळे फाटा येथील एका धाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकला मागील बाजूने धडक बसल्याने यात दोन्ही सख्ख्या भावाचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे तर कारमधील इतर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूर (Solapur) येथील खाजगी सीएनएस या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आण्णाराव सुर्यवंशी यांना दयानंद व सचिन हे दोनच मुलं होती. दयानंद बेल्लाळे हे चार वर्षांपासून पोलिस दलात शिपाईपदावर काम करीत होते, तर सचिन बेल्लाळे हे एक वर्षापासून लातूरला मार्केटिंग व्यवसाय करीत होते.अशातच बेल्लाळे कुटुंबीयांनी कार खरेदी केली होती. दोन्ही मुलांचा एकाच वेळी अपघातात मृत्यू झाल्याने बेल्लाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांवर रोकडा सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT