ready for the treatment of snakebite says dr. pallavi sable 
मराठवाडा

चिरमुड्या भाऊ-बहिणीचा गुदमरुन मृत्यू, आईवडीलांवर उपचार सुरु

सकाळ वृत्तसेवा

पालम (जि.परभणी) : पालम (Palam) तालुक्यातील आडगाव येथे शेतातील आखाड्यावर एका खोलीत हळदीच्या ढिगाऱ्याला कीड लागू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या विषारी गोळ्यांचा वायु (Poisonous Air) नाकात गेल्याने घुसमटून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२४) घडली आहे. तालुक्यातील आडगाव येथील ब्याळे यांच्या शेतात वाटेकरी असलेल्या शेतमजुराचे कुटुंब राहत होते(Parbhani). हे कुटुंब ज्या खोलीत राहत होते, त्या खोली लगतच असलेल्या दुसऱ्या खोलीत हळदीच्या पिकाचा ढिगारा होता. या ढिगाऱ्याला कीड लागू नये म्हणून विषारी गोळ्या ठेवून ही खोली बंद करण्यात आलेली होती. मात्र या खोलीतून विषारी वायू वाटेकरी शेतमजुराचे कुटुंब राहत असलेल्या खोलीत पसरला. या खोलीत असलेले भीमराव सदाशिव कुगणे आपल्या पत्नी व दोन मुलांसह रात्री झोपले होते.(two children died due to poisonous air in palam tahsil of parbhani glp88)

झोपेत हा विषारी वायू खोलीभर पसरला आणि तो श्वसनाद्वारे नाकात गेला. यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा कन्हैया व दीड वर्षांची मुलगी ज्योती या दोघांना त्रास सुरू झाल्यानंतर ते उठले. त्याच वेळी खोलीत विषारी वायू पसरल्याचे आणि त्यामुळेच श्वास गुदमरत असल्याचे भीमराव यांच्या लक्षात आले. श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याने गुदमरून ज्योती व कन्हैया हे अस्वस्थ झाले. भीमराव व त्यांच्या पत्नीलाही श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. ही बाब शेजाऱ्यांना कळाल्यानंतर या चौघांनाही नांदेड येथे उपचारार्थ हलवले असता ज्योती व कन्हैया या दोन बालकांचा मृत्यू झाला तर भीमराव व त्यांच्या पत्नीवर नांदेड (Nanded) येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT