Latur News
Latur News esakal
मराठवाडा

लातुरातील अन्नत्याग आंदोलनात शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

सकाळ वृत्तसेवा

लातूर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट मदत तात्काळ मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी येथे सोमवारपासून (ता.११) अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. दुसर्‍या दिवशी आंदोलनकर्त्यांपैकी दोन शेतकर्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना पोरके करणार्‍या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांपैकी २१ शेतकर्‍यांनी मुंडन केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो जणांनी मुंडण करीत शासनाचा निषेध केला. अन्नत्याग आंदोलनस्थळी पाठिब्यांसाठी जिल्हाभरातून अनेक शेतकरी नुकसान झालेले सोयाबीन आणून पाठिंबा देत आहेत. अतिवृष्टीमुळे लातूर (Latur) जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास वाहून गेलेला आहे. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना (Flood Hit Farmers) तात्काळ मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरसकट मदत जाहीर करावी. या करीता निलंगेकर यांच्या नेतृत्वात येथील शिवाजी चौकात ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. १२७ शेतकरी हे आंदोलन करीत आहेत.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलनकर्त्यांपैकी दोन शेतकर्‍यांची प्रकृती खालावली आहे. यामध्ये काशीनाथ गरिबे (ता. देवणी) व मुरलीधर सुर्यवंशी (मदनसुरी, ता. निलंगा) यांचा समावेश आहे. या दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत जाहीर न केल्याने सरकारने आपल्याला पोरके केल्याची भावना व्यक्त करीत शासनाच्या निषेधार्थ आंदोलनातील २१ जणांनी मुंडण केले. या मुंडण आंदोलनाला जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांनी पाठिंबा दर्शवत त्यांनीही मुंडण केले. या आंदोलनात निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर श्रृंगारे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे आदी सहभागी झाले आहेत.

निटूर कडकडीत बंद

अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज निटूरमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. सकाळपासूनच व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान शेतकर्‍यांना अद्यापही पिक विमा व सोयाबीन पिकाचे सरसकट नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकर्‍यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यामधून होत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT