मराठवाडा

प्रदेशाध्यक्षांच्या समोरच राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांच्या समोरच येथे शुक्रवारी (ता. २५) ऐन कार्यक्रमात पक्षातील गटबाजी दिसून आली. प्रदेशाध्यक्षांना हस्तक्षेप करून वाद मिटवावा लागला. हा प्रकार ‘परिवार संवाद यात्रे’त झाला. श्री.पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde, राज्यमंत्री संजय बनसोडे Sanjay Bansode , महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर Rupali Chakankar, राष्ट्रवादी काँग्रेसचे Nationalist Congress Party कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. पदाधिकारी यांचे मनोगत ऐकून घेताना दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. शिवाय आम्ही किती वर्षांपासून पक्षात आहोत आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगत एकमेकांची उणे-दुणे काढण्यास सुरवात झाली. अखेर पाटील यांना मध्यस्थी करून मिटवावा लागला. निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन गट आहेत. ही गटबाजी थांबवणे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संवाद यात्रेत नेत्यांच्या समोरच गटबाजी चव्हाट्यावर आल्याने नामुष्कीला तोंड द्यावे लागले.two groups dispute display before ncp state chief jayant patil in nilanga

नियमांचा फज्जा

कोरोना संसर्गाच्या सामाजिक अंतराचे पालन न करता नेत्यांसह पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. गर्दी जमवून सत्तेत असणाऱ्या नेत्यांनीच नियमाचे उल्लंघन केल्याचे येथे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT