मराठवाडा

अडीचशे जणांना एचआयव्हीची लागण 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील 33 हजार 446 जणांची एचआयव्ही तपासणी एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान करण्यात आली. यात 249 व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी दिली. 

जिल्हा एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण समिती व एचआयव्ही, टीबी समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक शुक्रवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक डॉ. जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. लड्डा, डॉ. जी. एम. कुडलीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, विजय देशमुख, डॉ. एम. टी. साळवे, संजय पवार, ज्योती वाडेकर यांची उपस्थिती होती. 

सात गर्भवती मातांना बाधा 
एप्रिल ते ऑगस्ट 2018 या कालावधीत जिल्ह्यातील 31 हजार 918 गर्भवती मातांचीही तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात गर्भवती मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर जिल्ह्यात पाच हजार 391 रुग्ण एआरटी केंद्रांत नियमितपणे औषधोपचार घेत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT