उमरगा : दोन लहान निरागस मुलींना पालकांच्या स्वाधीन करताना पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे आदी. सकाळ
मराठवाडा

पोलिस यंत्रणा हलली अन् चिमुकल्या मुलींना अखेर भेटले आई-वडील

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पालकापासून हरवलेल्या दोन लहान निरागस मुलींच्या पालकांना शोधून काढण्यासाठी उमरगा पोलिसांनी केलेले अथक प्रयत्न आणि सोशल मीडियाची मिळालेली साथ यामुळे अवघ्या पाच तासात पोलिसांनी  'त्या' एक दोन महिन्यांची व एक तीन वर्षांच्या मुलींना शनिवारी (ता.२४) रात्री आई -वडिलांच्या ताब्यात दिले. या बाबतची माहिती अशी की,  उमरगा येथील बसस्थानकावर शनिवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान एक अवघा दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन तिन वर्षांची मुलगी सोबत घेऊन घुटमळत आहे, अशी माहिती पोलिसाना मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, बिट अंमलदार श्री. कामतकर यांनी माहितीची शहानिशा केली. आजूबाजूला त्या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला. मात्र कुणीही मिळून आले नाही. शेवटी त्या दोन मुलींना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.(two little girl's parent found after five hours searching in umarga in osmanabad district glp88)

पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या मुलींना आरोग्य तपासणी करिता महिला पोलिस बबिता शिंदे, आम्रपाली पाटील यांनी उपजिल्हारुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी करून त्यांना कपडे, दूध व बिस्किटे देण्यात आली. पालकांचा शोध लागत नसल्याने या दोन महिला पोलिसांनी त्यांचा सांभाळ करीत होत्या. दरम्यान पोलिस यंत्रणा अत्यंत वेगाने त्या मुलींच्या पालकांचा शोध घेत होती. सोबतच सोशल मीडियावर सुद्धा त्या दोन मुलींचे फोटोसह पोस्ट करून मुलींच्या पालकांचा शोध घेण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले होते. तिन वर्षांच्या मुलीला बोलते करण्याचा प्रयत्न केले असता लमाण भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास आले.

येथील महिला पोलिस सुनिता राठोड व कर्मचारी कांतु राठोड व प्रकाश चव्हाण यांनी त्या मुलीकडून नाव गाव व पत्ता विचारले असता अणदूर तांडा ( ता. तुळजापूर)येथील असल्याचे निष्पन्न झाले. लागलीच पोलिसांनी त्यांच्या आईवडिलांना बोलावून खात्री पटवून त्या दोन मुलींना रात्री एक वाजता त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिस अधीक्षक राजरौशन तिलक, अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहायक पोलीस निरीक्षक श्री. गोरे आदींनी यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ministers: मंत्री घेणार आलिशान गाड्या; राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांसाठी तर मर्यादाच नाही, किती पैसे मंजूर?

Latest Maharashtra News Updates : सुसगावकडे जाणारी बस पाण्याचा अंदाज न आल्याने थेट खड्यात अडकली

Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार

Chakur News : सहकारमत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा; कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर

Nashik Railway Station : नाशिक रेल्वे स्थानक कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार; रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT