korona negetive 
मराठवाडा

हिंगोलीतील आणखी दोन कोरोनायोद्धे जिंकले

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या सुरेगाव (ता.औंढा) येथील दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून शनिवारी (ता.सहा) त्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच औरंगाबाद येथे भरती असलेल्या एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शनिवारी रात्री नऊच्या सुमारास प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आता एकूण १९२ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १६३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीला एकूण २९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

वसमत येथे १४ रुग्णांवर उपचार  

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण १४ रुग्ण दाखल असून यात हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुडवाडी एक, हयातनगर चार, कौठा एक, वसमत शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

आयसोलेशन वॉर्डात पंधरा रुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात एकूण पंधरा रुग्ण दाखल आहेत. यात सुरेगाव एक, नागेशवाडी एक, पहेणी दोन, चोंडी खुर्द दोन, बाराशिव दोन, रिसाला तीन, हिंगोलीतील नगर परिषद कॉलनतील चार रुग्णांचा समावेश असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१०५ जणांचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार १४६ संशयितांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार १२० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच दोन हजार १७५ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीला २६३ व्यक्ती भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर १०५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

कोरोनाचा अहवाल वेळेत सादर करावा : श्री. शर्मा

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वेळेत सादर कराव्यात, अशा सूचना ‘सीईओ’ राधाबिनोद शर्मा यांनी नोडल अधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता.पाच) आढावा बैठकीत दिल्या. येथील जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ श्री. शर्मा यांनी त्यांच्या दालनात शुक्रवारी नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन 

 या वेळी अतिरीक्त ‘सीईओ’ डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ, गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी पी. पी. घुले, चंद्रकांत वाघमारे, निलेश कानखेडे यांच्यासह नियुक्त केलेले नोडल अधिकारी उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैठक घेण्यात आली. 

आरोग्यविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना

नोडल अधिकाऱ्यांनी कामाचा दैनंदिन अहवाल वेळेत जिल्हा परिषदेकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कामात कुठेही हलगर्जीपणा चालणार नसून गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल तातडीने कळवावा, असे श्री. शर्मा यांनी बैठकीत सूचना दिल्या. बाहेर जिल्ह्यातील किंवा पर राज्यातील व्यक्ती जिल्ह्यात आल्यास तातडीने आरोग्यविषयक उपाययोजना करण्याच्या सूचनाही ‘सीईओ’ श्री. शर्मा यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT