jalna sakal
मराठवाडा

Jalna Crime News : लाचप्रकरणी दोन पोलिस कर्मचारी जाळ्यात

वाळू वाहतुकीचा टिप्पर पकडल्यानंतर तपासात मदत करत संशयिताला गुन्ह्यात जामीन दिल्यानंतर वाळूचा टिप्पर सुरू ठेवण्यासाठी पंधरा हजारांची लाच खासगी व्यक्तीमार्फत घेतल्या प्रकरणी सेवली (ता.जालना) पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

जालना : वाळू वाहतुकीचा टिप्पर पकडल्यानंतर तपासात मदत करत संशयिताला गुन्ह्यात जामीन दिल्यानंतर वाळूचा टिप्पर सुरू ठेवण्यासाठी पंधरा हजारांची लाच खासगी व्यक्तीमार्फत घेतल्या प्रकरणी सेवली (ता.जालना) पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

सेवली पोलिसांनी वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर पकडण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सेवली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गजानन नागरे यांच्याकडे होता. या प्रकरणातील संशयिताला जामीन दिल्यानंतर वाळूचा टिप्पर पकडणाऱ्या सेवली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रल्हाद भानुसे याने तक्रारदार यांच्या भावाकडे तपासात मदत करण्यासह वाळूचा टिप्पर सुरू ठेवण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती पंधरा हजार रूपये देण्याचे ठरले. मात्र, या प्रकरणी तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी (ता.३१) बेलोरा चौफुली (ता.मंठा, जि. जालना) येथे खासगी इसम प्रदीप ऊर्फ वामन खंदारे याला पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

या प्रकरणी सेवली पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार गजानन नागरे, पोलिस कर्मचारी प्रल्हाद भानुसे आणि खासगी इसम प्रदीप ऊर्फ वामन खंदारे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, सहायक फौजदार ज्ञानदेव जुंबड, पोलिस अंमलदार गजानन कांबळे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT