Beed News esakal
मराठवाडा

Beed | दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू, माजलगावमधील धक्कादायक घटना

त्या बुडत असताना महिलांनी आरडाओरड...

कमलेश जाब्रास

माजलगाव (जि.बीड) : गेवराई व परतूर येथून महातपुरी येथे मावसीकडे आलेल्या दोन मावस बहिणींचा गोदावरी (Godavari) बंधाऱ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.तीन) सकाळी घडली आहे. मन्यारवाडी (ता.गेवराई) येथील दीपाली गंगाधर बरबडे (वय २०) व आनंदगाव (ता. परतूर) येथील स्वाती अरूण चव्हाण (वय १२) या महातपूरी येथे मावशीकडे आल्या होत्या. त्या दररोज मावशी व आईसोबत गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी जात. (Two Sisters Drowned In Barrage In Majalgaon Taluka Of Beed)

शुक्रवारी सकाळी त्या मावशी व आपापल्या आईसोबत गेल्या असता स्वाती आंघोळ करत असताना पाण्यात बुडत असल्याचे पाहून दीपालीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दीपाली देखील पाण्यात बुडू लागली. त्या बुडत असताना महिलांनी आरडाओरड केली असता आजूबाजूचे लोक धावून आले. तोपर्यंत या दोघी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यांना सापडण्यासाठी जवळपास एक तास लागला. (Beed)

त्यांना वर काढून माजलगाव (Majalgaon) ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघींना मृत्य घोषित केले. या मृत्यू प्रकरणी लक्ष्मण रामभाउ शिंगाडे यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन प्रकरणाचा पुढील तपास पोलिस जमादार माणिक राठोड करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT