korona 
मराठवाडा

हिंगोलीत ‘कोरोना’चे दोन संशयित 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कारोनाची लक्षणे आढळलेल्या दोन संशयितांवर सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी (ता.१४) उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात एकजण पुणे येथून; तर दुसरा दुबईतून आला आहे. दोघांनाही सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून उपचारखाली ठेवण्यात आल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.  

हिंगोली जिल्ह्यात कोरानाचा अद्याप एकही रूग्ण आढळून आलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्व उपाय-योजना व जनजागृती केली जात आहे. परंतु, शनिवारी दोन संशयितांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केवळ संशयित म्हणून उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. दोघे संशयित प्रवासी ट्रॅव्हल्सने आल्यानंतर त्यांना कोरोनासी साम्य असलेली काही लक्षणे असल्याचे जाणवले. 

तपासणीचा अहवाल प्रयोग शाळेत पाठविला

त्यानंतर दोघेही हिंगोली शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेले होते. या वेळी संबंधित डॉक्टराने प्रथम तपासणी केली असता दोघांमध्येही कोरोनाचे साम्य असलेली लक्षणे आढळून आली आहेत. त्‍यानंतर दोघांनाही प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असता दोघांचे रक्त तपासणी, एक्‍सरे, केपीटी, एलएफटी, सीबीसी, सॅप सॅम्‍पल आदींची तपासणी करून पुणे येथील प्रयोग शाळेकडे रिपोट पाठविण्यात आला आहे.

खबदारी म्हणून त्यांना उपचाराखाली ठेवले

 सध्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. दोघेही कोरोनाग्रस्त नाहीत. केवळ ते दोघे पुणे व दुबई येथून हिंगोलीत आल्याने सुरक्षीततेच्या दृष्टिकोनातून खबदारी म्हणून त्यांना उपचाराखाली ठेवल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 
 
रेल्‍वे प्रवाशांची संख्या घटली

हिंगोली :  काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाच्या विषाणूंची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत असून याचा परिणाम रेल्वे प्रवासावरही झाला आहे. शनिवारी अकोला ते पूर्णा व पूर्णा ते अकोला मार्गाने धावणाऱ्या सर्वच रेल्‍वे गाड्यातील प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे पहावयास मिळाले. कोरोना विषाणूंची नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम देखील कमी झाले आहेत. अनेक जण अशा कार्यक्रमात जाणे टाळत आहेत. त्याचा परिणाम रेल्‍वेच्या प्रवाशांवर देखील झाला आहे.

प्रवासी करताहेत मास्‍कचा वापर

 या मार्गावरून एक्‍सप्रेस व सुपरफास्‍ट गाड्यांचे आरक्षण कमी झाले आहे. या मार्गावरून धावणारी अमरावती- पुणे या गाडीचे आरक्षण बंदच झाले आहे. तसेच कोल्‍हापूर- नागपूर या गाडीची देखील परिस्‍थिती अशीच आहे. दररोज सकाळी पुर्णा व अकोल्याकडून येणाऱ्या पॅसेंजर गाड्यातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असत. आता मात्र प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे रेल्‍वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. रेल्‍वेने प्रवास करणारे प्रवासी मास्‍कचा वापर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

Belagav Farmers Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दगडफेकीत सहा पोलिसांसह अनेक जण गंभीर जखमी

अखेर बावनकुळेंच्या खात्याला जाग; फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीला ४२ कोटींची नोटीस

Latest Marathi News Live Update : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

SCROLL FOR NEXT