0Crimenews_13
0Crimenews_13 
मराठवाडा

तीन दुचाकीसह दोन चोरटे गजाआड, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बीड : चोरलेल्या दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शनिवारी (ता.२६) बेड्या ठोकल्या. ही कारवाई तालुक्यातील नांदूरफाटा येथे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून दुकानफोडीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.
मधुकर गणपत काळे (रा. सावळेश्वर पैठण, ता. केज), देविदास बन्सी काळे (रा. बनसारोळा, ता. केज) अशी संशयितांची नावे आहेत. ते दोघे चोरीच्या दुचाकीवरून शनिवारी केजहून नांदूरफाटा येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना मिळाली होती.

त्यावरून दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक भास्कर नवले, पोलिस कर्मचारी नरेंद्र बांगर, श्रीमंत उबाळे यांनी सापळा लावून त्यांना पकडले. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. 'खाक्या' दाखविल्यावर त्यांनी तोंड उघडले. काही दिवसांपूर्वी नेकनूर ठाणे हद्दीतील येळंबघाट येथून त्यांनी ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय दिंद्रूड व लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. ७८ हजार किमतीच्या तीन दुचाकींसह त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.



हेच दुकानफोडीच्या गुन्ह्यातलेही फरार
मधुकर काळे व देविदास काळे हे दोघे अट्टल गुन्हेगार आहेत. धारूर येथे बिअर शॉपी तर दिंद्रूड येथे एका दुकानात त्यांनी चोरी केली होती. या दोन्ही गुन्ह्यांत ते निष्पन्न झाले होते; परंतु पोलिसांना गुंगारा देत फिरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT