Accident News  sakal
मराठवाडा

Accident News : बिडकिन रोडवर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; एक ठार, चार जण जखमी

शादर्शक फलक किंवा सुचना फलक न लावल्याने हा अपघात झाला

सकाळ डिजिटल टीम

बिडकिन : येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील चितेगाव गावानजिक असलेल्या रमानगर वस्ती समोर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना आज(ता.०९) मंगळवारी रोजी अंदाजे ०८ वाजेच्या सुमारास घडली आहे.बिडकिन‌‌ कडुन चितेगाव दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच २० जी यु ६६०१ व चितेगाव कडुन पैठण कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच १७ आर ३७४६ यांच्यात हि जोरदार धडक झाली आहे.

घटनास्थळी बिडकिन येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप गायकवाड यांच्या चारचाकी वाहनाने व नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे सर्व जखमींना उपचारासाठी दाखल केले असता महमद अरमान मंसुरी,वय .22 वर्षे,रा.उत्तरप्रदेश,हल्ली मुक्काम रा.पैठण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमी पंकज कुमार वय २० वर्षे,सचिन कनोजिया,वय २२ वर्षे,शिवनाथ कनोजिया २० वर्षे सर्व रा.सर्व रा. 51 गाव नकाहा,ता. रुधोली,जिल्हा बस्ती,उत्तर प्रदेश आणि नैमुद्दिन सलमानी वय २० वर्षे,रा .उत्तर प्रदेश,हल्ली मुक्काम रा.पैठण.ता.पैठण अशी अपघातात गंभीर जखमींची नावे आहेत.

सर्व गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, पोलिस कर्मचारी भारत शेजुळ, राहुल बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांना हटवत वाहनांची गर्दी सुरळीत सुरू केली.

दुचाकींचा अपघात झाल्यानंतर सर्व जखमी हे घटनास्थळी तब्बल अर्धा तास जखमी अवस्थेत पडलेले असल्याची माहिती नागरिकांनी दिली असुन वारंवार रुग्णवाहिका सेवा 108 व रोड अपघात रुग्णवाहिका सेवा 1033 यांना कळविले असता कुठलीही मदत न मिळाल्याने रुग्णवाहिका सेवेच्या कारभारावर प्रश्न निर्माण होत आहेत अशी चर्चा वाहनधारक व नागरिकांत सुरू होती.

सद्यस्थितीत रोडचे काम सुरू आहे रोडच्या कामाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची कामे केली जात नाहीत तर रोडचे काम सुरु आहेत किंवा कामकाज सुरू आहे याबाबत चे कुठलेही दिशादर्शक फलक किंवा सुचना फलक न लावल्याने हा अपघात झाला आहे असे आरोप वाहनधारकांनी केले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT