Beed Accident esakal
मराठवाडा

Beed|एक महिन्यानंतर घरी परतणाऱ्या दोघा तरुणांचा अपघातात मृत्यू

एक महिन्यापासून ते दोघे रोजंदारीचे काम करत होते.

भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : गेल्या एक महिन्यापासून रोजंदारी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा दुचाकीवरून परत येत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. यात गेवराई तालुक्यातील दोन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.आठ) रात्री पाथरी-परभणी (Parbhani) रस्त्यावरील वडगाव फाटा येथे घडली. जीवन सुरेश नाडे (रा.ढालेगाव) व संतोष रामभाऊ वाघमोडे (रा.तपेनिमगाव, ता.गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे युवक गेल्या एक महिन्यापासून कंत्राटदार यांच्याकडे परभणी येथे रोजंदारीवर काम करत होते. बुधवार ते आपल्या गावाकडे दुचाकीवरून परत येत असताना पाथरी - परभणी रस्त्यावरील वडगाव फाट्याजवळ समोरून येणा-या वाहनाने जोराची धडक दिली. (Accident In Beed)

यात दुचाकीवरील जीवन नाडे व संतोष वाघमोडे या युवकांचा जागीच मृत्यू झाला. या झालेल्या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यातील ढालेगाव-तपेनिमगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे. यातील संतोष वाघमोडे हा युवक विवाहित असून जीवन नाडे हा अविवाहित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

Keshav Upadhye : मोदींना हरवले, पण नुकसान महिलांचे; प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका

Tajmahal Case: ताजमहलची ऐतिहासिक केस ४२ वर्षांनंतर संपली! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आज फ्री एंट्री

SCROLL FOR NEXT