file photo 
मराठवाडा

नांदेडमधील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी, तसेच सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर जाहीर झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाल्याने यंदा पीकविमा मंजूर होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


राज्यातील कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यात येते.


सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर जाहीर करण्यात
शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ता. ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर जाहीर करण्यात आली. यानंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते.


तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राजकीय, तसेच शेतकरी संघटनांकडून पैसेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर करण्याची मागणी केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यामुळे यंदा खरीप पीकविमा मंजूर होइल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.


अंतिम पैसेवारी निश्‍चित करण्यात आली
जिल्ह्यातील एकूण एक हजार ५६२ गावांतील सात लाख ६६ हजार ६०५ हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी सात लाख २० हजार १०६ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्‍चित करण्यात आली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे.

तीन टप्प्यांत पैसेवारी
दरवर्षी हंगामी पैसेवारी ता. ३० सप्टेंबर, सुधारित पैसेवारी ता. ३१ ऑक्टोबर; तर अंतिम पैसेवारी ता. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ता. तीन नोव्हेंबर २०१५ च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी
(पैसेवारी पैशात)
नांदेड - ४४, अर्धापूर - ४८, कंधार - ४८, लोहा - ४८, भोकर - ४८, मुदखेड - ४७, हदगाव - ४८, हिमायतनगर - ४७, किनवट - ४७, माहूर - ४७, देगलूर - ४७, मुखेड - ४७, बिलोली - ४८, नायगाव - ४८, धर्माबाद - ४८, उमरी - ४७.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT