file photo 
मराठवाडा

Video: मानाच्या संदलाने परभणीत उरुसास सुरवात

गणेश पांडे

परभणी : येथील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क साहेब (तुरुतपीरबाबा) यांच्या उरुस यात्रेला शनिवारी (ता.एक) मानाच्या संदलाने सुरवात झाली. जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी मानाची गलफ डोक्यावर घेऊन तुरुतपीर बाबाच्या दर्गावर चढविला.

परभणी येथील हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या उरुस यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली. हा उरुस पुढील दहा दिवस चालणार आहे. या उरुस यात्रेला भारतभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेल्या दर्गा परिसरातून मानाच्या संदलाला सकाळी सुरवात झाली. या वेळी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वफ्क बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. मानाच्या संदलाची शहरातून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या दर्ग्यावर चढविण्यात आली. या वेळी जिल्हात शांतता नांदावी, अशी मागणी उपस्थित सर्व अधिकारी व भाविकांनी दर्ग्यासमोर व्यक्त केली.

हेही वाचा - स्थायी समितीच्या सभापतीपदी गुलमीरखान

उरुसाला शेकडो वर्षांची परंपरा
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या उरुसाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सर्व धर्मांतील लोक हा उरूस हर्षोल्हासात साजरा करत असतात. या वर्षी ता. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान, उरूस यात्रा भरणार आहे. ता. दोन फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुटी जाहीर केली आहे. प्रशासनाच्या वतीने मानाचा संदल काढून यात्रेला सुरवात झाली आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका यांच्या वतीनेदेखील संदल काढून हजरत सय्यद शहा तुराबुल हक साहेबांना गलफ सोडविला जातो. जाम रस्त्यावरील दर्गा मैदानात मीना बाजार आणि उंच रहाट पाळणे व मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. उरुसासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून व्यापारी परभणी शहरात दाखल झाले आहेत. 

दर्ग्यावर विद्युत रोषणाई
चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यात्रेच्या स्थळाची पाहणी केली. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतेची व्यवस्था केली जात आहे. पोलिस व महापालिकेचे कार्यालयदेखील यात्रेत उघडण्यात आले आहे. महत्त्वाच्या असणाऱ्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांच्या दर्गाला रंगरंगोटी केली जात आहे. या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT