file photo 
मराठवाडा

बॅंकेच्या सेवा केंद्रांचा वापर करा : जिल्हाधिकारी

गणेश पांडे

परभणी: कोरोना विषाणू (कोविड-१९) च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खातेदारांनी बँकेत गर्दी न करता राष्ट्रीयीकृत बँकेने व ग्रामीण बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्राहक सेवा केंद्रांचा (CSP) वापर करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.


जिल्ह्यामध्ये आज रोजी परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत ग्रामीण बँकेचे विविध ठिकाणी एकूण ३३७ ग्राहक सेवा केंद्र कार्यरत असून या केंद्रांमार्फत दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपयांपर्यंत पैसे भरणे व २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम इतरांच्या खात्यामध्ये भरणे या सेवा पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांमार्फत २० हजार रुपयांपर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपयांपर्यंत पैसे भरणे व ५० हजार रुपयांपर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरण्याची सेवा पुरविण्यात येत आहे. तरी बँकेमार्फत गाव व दिवसनिहाय ग्राहक सेवा केंद्रांचे वेळ बँकांकडून घोषित करण्यात येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रांवरील (SCP) सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकांनी या सेवा केंद्रांचा वापर केल्यावर त्यांना बँकेच्या शाखेपर्यंत प्रवास करावा लागणार नाही. यामुळे काम सोपे होण्यास मदत होणार आहे . तरी या सेवेचा सर्व खातेदारांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

जमावबंदीचे सुधारीत आदेश जारी
जिल्हाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे ता. ३१ मार्चपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. परंतु, केंद्र शासनाने ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने ता. २२ फेब्रुवारी व त्यानंतर वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा कालावधी सुधारीत आदेशानुसार ता. १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, निर्देश, परिपत्रके या कालावधीत अमलात राहतील. हे आदेश ता. ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

फॅमिली मॅन म्हणवणाऱ्या अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींशी शारीरिक संबंध; डिटेक्टीव्हची पोलखोल; पत्नीलाही सगळं माहितीये पण...

SCROLL FOR NEXT