Vaccination has been started in Beed.jpg 
मराठवाडा

बीडमध्ये लसीकरणाला सुरुवात; वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली पहिली लस

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : गेल्या वर्षभरापासून ज्या विषाणूने संपूर्ण जगाला संकटात टाकले आहे. त्या विषाणूवरील लसीकरणाला देशभरात सुरुवात करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश कुरमे यांनी पहिली लस घेऊन सुरुवात केली.

औरंगाबादच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला देशात शनिवारी (ता.१६) सुरुवात झाली. या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात देशाच्या लसीकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर सुरुवात केल्यानंतर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश कुरमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, लसीकरण मोहीमेचे प्रमुख डॉ. वैभव डुबे यांनी स्वतः लस घेऊन शनिवारी सकाळी १०.४० च्या सुमारास सुरुवात करण्यात आली. पहिली लस परिचारिका वनश्री जाते धव यांनी दिली.

तालुक्यातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी लस देण्यात येणार आहे. येथील लसीकरण मोहीमेत डॉ. संजय गित्ते, डॉ.अर्शद शेख, शिक्षक ए. झेड. शेख, परिचारिका वनश्री जाधव, एच.जी.सय्यद, मंगल गित्ते, ज्योती जगतकर, निता मगरे, श्रीमती सिराम आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पहिली लस घेतल्यानंतर डॉ. कुरमे यांनी सांगितले की, मी तालुक्यातील पहिली लस घेतली, मला कोणताही त्रास झाला नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी. घाबरून जावू नये. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस मी घेतली मला कोणताही त्रास झाला नाही. तालुक्यातील सर्व सरकारी, खाजगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी, यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT