file photo 
मराठवाडा

कुलगुरू डॉ. अशोक ढवण शेतकऱ्यांच्‍या बांधावर

कैलास चव्हाण

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्‍ट्र शासन कृषी विभागाच्‍या वतीने पोकरा प्रकल्‍पातील सोन्ना (ता. परभणी) येथील शेतकऱ्यांच्‍या शेतात रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन पेरणीचे प्रात्‍यक्षिक कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थित बुधवारी (ता.१७ ) घेण्‍यात आले.
कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संतोष आळसे, कृषी विद्यावेत्ता डॉ. उदय आळसे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, कृषी अभियंता डॉ. स्मिता सोळंकी, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, डॉ. राहुल रामटेके, डॉ. संजीव बंटेवाड, तालुका कृषी अधिकारी  पी. बी बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘मराठवाड्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. बदलत्‍या हवामानात कधी अधिक पाऊस, तर कधी पाऊसाचा मोठा खंड पडतो. यामुळे सोयाबीन उत्‍पादनावर मोठा परिणाम होतो. याकरिता रुंद वरंबा व सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली तर अधिकचे पडणारे पाऊसाचे पाणी सरीतून वाहून जाते, तसेच कमी पावसात पडलेले पाणी कार्यक्षमरीत्‍या पिकास उपलब्‍ध होते. कृषी विद्यापीठाने पाच फणी रुंद सरी वरंबा बी, खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र विकसित केले असून सदरील यंत्र शेतकऱ्यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने व्‍यावसायिकरीत्‍या तयार करण्‍याचे अधिकार पुणे येथील रोहित कृषी इंडस्ट्रिज यांच्‍यासोबत सामंजस्‍य करार करण्‍यात आला आहे. या यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी, तणनाशक व कीडकनाशक फवारणी, रासणी सर्व कामे करणे शक्‍य आहे. येणाऱ्या काळात हे यंत्र सर्वत्र उपलब्‍ध होऊन जास्‍तीत जास्‍त सोयाबीन पेरणी झाल्‍यास निश्चितच शेतकऱ्यांचे सोयाबीन उत्‍पादनात भरीव वाढ होण्‍यास मदत होईल.’’

शेतकऱ्यांचा फायदा होईल
संतोष आळसे म्‍हणाले की, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध झालेल्‍या बीबीएफ यंत्राने या वर्षी प्रायोगिक तत्‍वावर जिल्‍ह्यातील पोकरा प्रकल्‍पांतर्गत निवडक गावांत शेतकऱ्यांच्‍या शेतावर पेरणी करण्‍यात येणार आहे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास निश्चितच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होईल, याकरिता कृषी विभागातील योजनेचा लाभ घ्या.’’

शेतकऱ्यांना दिले यंत्र जोडणीचे प्रशिक्षण
यावेळी विद्यापीठ कृषी अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित चार फणी रुंद सरी वरंबा बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी कशी करावी, यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी व रासणी करण्‍याचे मार्गदर्शन करून प्रात्‍यक्षिक पोकरा प्रकल्‍पाचे पाल्‍य शेतकरी राम गमे यांच्‍या पाच एकर शेतावर दाखविले. सोन्ना येथील काही निवडक शेतकऱ्यांच्‍या ३० एकर जमिनीवर कृषी विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT