मराठवाडा

...या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली): निसर्गाचा लहरीपणा, अवर्षणजन्य परिस्थिती, तणनाशकांचा अतिवापर, पडिक जमिनी वहितीखाली आणण्याचे वाढलेले प्रमाण यासह विविध कारणांमुळे नैसर्गिक उगवणाऱ्या रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. अलीकडच्या काळात तर नैसर्गिक असलेला अमोल ठेवा दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे.

पावसाळी रानभाज्याची पेरणी करावी लागत नाही. ना मशागत, ना खर्च व कोणतेही बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही. मागील पावसाळ्यात परिपक्व झालेल्या भाज्यांपासूनच बियाणांची निर्मिती होऊन त्या भाज्या येत असत. हे नैसर्गिक चक्र अव्याहत सुरू राहत होते. ग्रामीण भागातील डोंगरावर येणाऱ्या रानभाज्यांची ग्रामस्थांना चांगली ओळख असते. आयुर्वेदामध्येही याला अधिक महत्त्व आहे. विशेषतः कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी नाही. रोगराई नसल्याने त्या खाण्यासाठी पौष्टिक असतात. अनेक व्याधींवर उपचार म्हणून उपयोग होण्यास मदत मिळते.

पिढ्यानपिढ्या जोपासलेली माहितीची परंपरा

निसर्गाने दिलेला अमोल ठेवा रस्त्याच्या कडेला, डोंगराळ भाग, हलक्या जमिनीत जास्त प्रमाणात होत्या. मात्र, मागील काही वर्षांपासून त्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. रानभाज्या कशा, कधी, कोणता भाग खायचा याची अनमोल माहिती मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जोपासलेली आहे. मागील काही दशकांत कृषी व्यवस्थेत झालेल्या अमूलाग्र बदलांमुळे रानभाज्याची माहिती तरुण पिढीपर्यंत पोचू शकली नाही. बाजारात मिळणाऱ्या विविध भाज्यांच्या दैनंदिन आहारात वापर मोठ्या प्रमाणात वाढला. आपसूक मिळणाऱ्या रानभाज्या दुर्मिळ झाल्या आहेत. 

चौरस व पौष्टिक अन्न पुरविण्यास मदत

या भागात खडक शेपू, तरोटा, हाडसण, तांदूळ कुंद्रा, घोळ, पाथरी, अंबाडी, अंकुर, वाघाट यासह विविध रानभाज्या अलीकडच्या काळात दुर्मिळ झाल्या आहेत. या भाज्यांतून चौरस व पौष्टिक अन्न पुरविण्यास मदत मिळायची. शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकतत्वे, लोह, कॅल्शियम जीवनसत्वे जास्त प्रमाणात रानभाज्यातून मिळतात. त्यामुळे आजार होऊच नये, यासाठी उपयुक्त ठरतात. अनेक व्याधींवर या रानभाज्यांचा उपचार म्हणून उपयोग होत असतो. मात्र, विविध कारणांमुळे निसर्गाचा हा अनमोल ठेवा नामशेष होऊन दुर्मिळ होत चालल्याचे चित्र आहे.

तणनाशकांचा अतिवापर वाढला

मागील काही वर्षांत कमी पर्जन्यमान, पडिक जमिनी वहितीखाली आणणे, पीक उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांकडून तणनाशकांच्या अतिवापरामुळे विविध रानभाज्या नामशेष होत चालल्या आहेत. त्या मिळणे आता दुर्मिळ झाले आहे. नैसर्गिक मिळालेला रानभाज्यांचा अनमोल ठेवा संपुष्टात येऊ लागला आहे.
-प्रकाश शिंदे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT