file photo  
मराठवाडा

‘त्या’ घटनेतुन पीडित कुटुंब अजूनही सावरले नाही 

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील शंकरनगर (बिलोली) येथील श्रीसाईबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका शाळकरी मुलीवर शाळेतीलच शिक्षकांनी अत्याचार केला होता. अत्याच्यार पीडित मुलीवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातुन पीडित मुलीस घरी पाठविण्यात आले आहे. मात्र^पीडित मुलगी आणि कुटुंबिय या धक्यातुन अजुन देखील सावरले नाही.

सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यात दोन ठिकाणी मुलींच्या निवासी शाळा आहेत. या दोन शाळा माहुर आणि हदगाव येथे आहेत. त्यामुळे शंकरनगर येथील पीडित विद्यार्थीनीस तिच्या इच्छेनुसार कुटुंबासह पूनर्वसन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. प्रथमच सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी इच्छेप्रमाणे विशेष योजनेतुन घरकुल बांधुन देण्यात येणार आहे.

शंकरनगर अत्याचार प्रकरणातील शिक्षक दयानंद राजुरे, सय्यद रसुल, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके या चारही आरोपीवर पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अत्याचार प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरारच आहे. फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच व फॅक्युचअल कमिटी अगेन्स्ट सेक्युरल हरॅसमेंट आॅफ चाईल्ड या संघटनेने या प्रकरणातील तपास यंत्रणेवर संशय घेतला आहे. हे प्रकरण नियोजनबद्ध पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संघटनेचे डॉ. श्री दवणे, श्री. नरबाग,  प्रा. सतिश वाघरे, प्रकाश दीपके, ॲड. अस्मिता वाघमारे, श्रीनिवास पाटील, अक्षय कांबळे, अमोल महिफळे, प्रवीण सावंत, सुमेध सदावर्ते यांच्या कमेटीने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. 

पीडित मुलीचे पूनर्वसन पुढील आठवड्यात
सध्या पीडित मुलगी कुटुंबासह गावी असून, तिला या धक्क्यातुन सावरण्यासाठी काही दिवसासाठी रम्य ठिकाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न कुटुंबियांकडून सुरु  सुरु आहे. त्यामुळे सध्यातरी पीडित मुलीचे पूनर्वसन होणार नाही. परंतु, पुढील आठवड्यात जेव्हा पीडित मुलगी कुटुंबासह परत येईल तेव्हा सामाजिक न्याय विभागाकडून संपूर्ण कुटुंबाचे पूनर्वसन होणार आहे.
- तेजस माळवदकर  (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT