photo 
मराठवाडा

Video: बुद्धांच्या जन्मभूमीत बुद्धांचे पुनरागमन : भदंत वोनेयुंग (दक्षिण कोरीया)

पंजाब नवघरे

वसमत(जि. हिंगोली) ः अडीच हजार वर्षांपूर्वी भारतभूमीत तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाला. चिनी पंडितांनी चीन, जपान, थायलंड मार्गे दक्षिण कोरियात बौद्ध धम्‍माचा प्रसार व प्रचार केला. आज जगातील अनेक राष्ट्रांत बौद्ध धम्‍म प्रमुख धर्म आहे. परंतु, मध्यल्या काळात भारतात बौद्ध धम्म क्षीण झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धम्म दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले आहे. आज बौद्ध भिक्खू व उपासकांची वाढती संख्या म्हणजे भारतात बौद्ध धम्मांचे पुनरागमन होय, असे प्रतिपादन दक्षिण कोरिया येथील भदंत वोनेयुंग यांनी केले.

येथील यशवंत उबारे यांच्या निवासस्‍थानी नुकतेच भदंत वोनेयुंग आले असता ते बोलत होते. या वेळी दक्षिण कोरियातील विद्यापीठाचे कुलगुरू चेऊंकम, म्यानमारचे भदंत आयुपाल, आयरलॅंडचे भदंत सूर्या, अखिल भारतीय भिक्‍कू महासंघाचे महासचिव भदंत प्रज्ञादीप महाथेरो, हैदराबाद येथील बौद्ध धम्‍माचे अभ्यासक डॉ. मैत्रीपीर नागार्जुन, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पय्याबोधी आदींची उपस्‍थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने बोधीसत्‍व

या वेळी भदंत वोनेयुंग म्हणाले, ‘‘भारतात बौद्ध धम्‍माचे पुररुज्जीवन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्‍यांच्या लाखो अनुयायांसोबत धम्‍म दीक्षा घेऊन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने बोधीसत्‍व ठरतात. ते आधुनिक बुद्धच आहेत. चाळीस वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा मी आलो होतो. त्‍यांनतर पन्नास पेक्षा वेळा अधिक भारतात आलो आहे. मात्र, कोणाच्या घरी गेलो नाही. पहिल्यांदा श्री. उबारे यांच्या निवासस्‍थानी आलो असून आनंदी झालो आहे.’’

श्री. उबारे यांच्या धम्‍मशील वर्तनाने प्रभावित

यशवंत उबारे दोन वेळा दक्षिण कोरियाला आल्याची आठवण भदंत वोनेयुंग यांनी करून दिली. मी व माझे सर्व सहकारी श्री. उबारे यांच्या धम्‍मशील वर्तनाने प्रभावित झालो असून त्यांच्या हातून धम्‍माची मोठी सेवा घडणार असल्याचे ते म्‍हणाले. या वेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी धम्‍मदेशना दिली. त्‍यानंतर भोजनान व खीरदानाचा कार्यक्रम झाला.

येथे क्लिक कराविद्यार्थ्यांना का हवा ‘शिवभोजना’चा आधार ​

धम्म बांधवांची उपस्थिती

या वेळी सीताराम उबारे, मारोतराव उबारे, राजाभाऊ उबारे, पवन उबारे, बंटी उबारे, लाला उबारे, इंजि. एस. पी. मुळे, प्रा. सुभाष मस्‍के, कवी श्रीरंग थोरात, भीमटागर सेनेचे विजयकुमार एंगडे, पी. सी. कांबळे, श्री. कसबे यांची उपस्‍थिती होती. मराठी अनुवाद नितीन साळवे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT